Goa Bike Accident Nuvem Junction Rider Killed
मडगाव: राज्यातील अपघात काही केल्या थांबायंच नाही घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच, नुवे जंक्शन येथे वीजखांबाला धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने दुचाकीचालक रामदयाल चव्हाण हा ठार झाला. हा अपघात शनिवारी (ता. 22) नुवे जंक्शन येथे होंडा शोरुमजवळ घडला.
दरम्यान, रामदयाल हा डोंगरी-वास्को येथे राहत होता. त्याच्या बुलेटच्या मागे बसलेली स्नेहा एलीप्रभता (बायणा) ही युवती गंभीर जखमी झाली. रामदयाल याला गंभीर जखमी अवस्थेत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी (Doctors) त्याला मृत घोषित केले. रामदयाल चव्हाण याच्या अकाली मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मायणा-कुडतरी पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर कामत करत आहे.
दुसरीकडे, वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मद्यधुंद आणि भरधाव वेग ही अपघातांची मुख्य कारणे आहेत. पोलिसांकडून वेळोवेळी जागृती केली जाते. तसेच अचानक नाकाबंदी करुन मद्यचाचणी, तपासणी केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोलिसांनी चारपटीने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याची प्रकरणे नोंदवली आहेत. सरकार आणि वाहतूक पोलिस अपघातांवर (Accident) नियंत्रण आणण्यासाठी वेळोवेळी अनेक अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करुन तिथे डागडुजी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही प्रक्रिया लांबलचक आणि किचकट असल्याने ती पूर्ण करण्यास वेळ जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.