दोडामार्ग रस्त्यावरील असुरक्षित दगड  Dainik Gomantak
गोवा

Goa: दोडामार्ग रस्त्यावरील 'ते' ठिकाण वाहतुकीस धोकादायक

रस्त्यानजीक असलेला 'भलामोठा दगड' ठरु शकतो घातक

Dainik Gomantak

Goa: अस्नोडा-दोडामार्ग रस्त्यावरील (Assnora-Dodamarg road) कासारपाल येथे रस्त्यावरच कोसळलेला एक भलामोठा दगड (Dangerous stone) वाहतुकीस अत्यंत धोकादायक (Risk for Transportation) ठरत आहे. अपघातास आमंत्रण ठरू शकणारा रस्त्यावरील हा 'भलामोठा दगड' त्वरित हटवावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

मुळगाव-दोडामार्ग रस्त्यावरील कासारपाल येथे दोडामार्गच्या दिशेने जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूने एक भलामोठा दगड धोकादायक अवस्थेत स्थिरावलेला आहे. हा दगड रस्त्याच्या बाजूने कधी स्थिरावलाय त्याबद्दल निश्चित माहिती नसली, तरी जोरदार पावसावेळी दरडीसह हा दगड रस्त्यावर कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात रस्त्याच्या बाजूने वाढलेली झुडपे छाटल्यानंतर कासारपाल दरड कोसळल्याचे आढळून आले आहे.

दगड धोकादायक अवस्थेत

कासारपाल येथे रस्त्यावर आलेला हा भलामोठा दगड म्हणजे वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. रात्रीच्यावेळी तर वाहनचालकांना सहजासहजी या दगडाचा अंदाज येत नाही. मुळगाव-दोडामार्ग रस्त्यावरुन दरदिवशी हजारो वाहनांची ये-जा चालू असते. मात्र कासारपाल येथील रस्त्यावरील हा दगड एखादेवेळी भयानक अपघातास कारणीभूत ठरण्याची संभावना नाकारता येत नाही. तशी भीतीही वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

धोकादायक दगड हटवा

रस्त्यावरील या दगडामुळे अपघातासारखी भयानक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा vअनर्थ टाळण्यासाठी वेळीच दगड हटवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा.अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगालदेश मालिका गमावल्याचा काढला राग

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धाबाबत 'भ्रामक' पोस्ट करण पडलं महागात, युएईमध्ये 19 भारतीयांसह 35 जण जेरबंद; सुटकेची आशा धूसर

'जंगल हे उपासनेचे ठिकाण आहे आणि धबधबे ध्यान करण्याची जागा'! गोव्यातील वाढणारी कचरासमस्या आणि दुष्परिणाम

Cost Of Living in Goa: गोव्यात राहण्यासाठी महिन्याला किती खर्च येतो? महिला इंजिनिअरनं सांगितलं तगडं 'बजेट'; सोशल मीडियावर रंगली चर्चा VIDEO

SCROLL FOR NEXT