Casino Panjim Goa Dainik Gomantak
गोवा

Casino Panjim Goa: बिग डॅडी कॅसिनोच्या बनावट एंट्री पास प्रकरणी कोल्हापूरच्या तिघांना अटक

Casino Panjim Goa: ग्राहकांची 10,500 रुपयांची फसवणूक

Ganeshprasad Gogate

Casino Panjim Goa: मांडवी नदीच्या तीरावरील ‘बिग डॅडी’ या तरंगत्या कॅसिनोचे बोगस प्रवेश पास बेल्ट ग्राहकांना विक्री करून 10,500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी कोल्हापूर येथील तिघांना अटक केली.

कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे निखिल दिलीप फाळके (वय 30), चेतन किलकिले (वय 28) व श्रीनिधी मांडवकर (वय 27) अशी आहेत. हे सर्वजण कोल्हापूर येथील रहिवासी आहेत.

या तिघांनी 2 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास बिग डॅडी कॅसिनो कार्यालयाच्या रिसेप्शन काउंटरच्या बाहेर काही पर्यटकांना कॅसिनोच्या प्रवेश पास बेल्टची विक्री केली.

जेव्हा हे पर्यटक प्रवेश करण्यासाठी जात होते तेव्हा तेथील कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले.

सुमारे 10 हजार 500 रुपयांचे प्रवेश पास बेल्ट त्यांनी विकले होते. याप्रकरणी अमित गर्ग याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

कोल्हापूरात कारवाई:-

1) बिग डॅडी कॅसिनो कार्यालयाच्या आत व बाहेर असलेल्‍या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या संशयितांची माहिती मिळाल्यावर तपास सुरू झाला होता.

त्यातील दोघा अनोळखी व्यक्तींचे मोबाईल क्रमांकही सापडले होते. त्याच्या आधारे अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने त्यांचा मागोवा पणजी पोलिसांनी घेतला.

2) त्यानंतर कोल्हापूर येथे पणजी पोलिसांचे एक पथक रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन या तिघा संशयितांचा शोध घेतला असता ते जाळ्यात सापडले.

गुरुवारी या तिघांनाही पणजीत आणून अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडी घेण्यात आली आहे, अशी माहिती चोडणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT