Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vidyadhar Shirodkar: विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे

Vidyadhar Shirodkar: डिचोलीत विद्यार्थ्यांचा सम्राट पुरस्काराने गौरव

दैनिक गोमन्तक

Vidyadhar Shirodkar: जीवनात यश प्राप्त करून आदर्श भवितव्य घडवायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी अगोदर मनावर ताबा ठेवावा. पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत डिचोलीतील पूज्य साने गुरुजी ज्ञानोपासना मंदिर संस्थेचे अध्यक्ष विद्याधर शिरोडकर यांनी व्यक्त केले.

डिचोली सम्राट क्लब आयोजित सम्राट पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. शिरोडकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. सम्राट विद्यार्थी फाउंडेशनच्या सहकार्याने येथील राधाकृष्ण विद्यालयात आयोजित या सोहळ्यास सम्राट विद्यार्थी फाउंडेशनच्या प्रतिनिधी तथा राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षिका विद्या म्हाळशेकर, डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष नीलेश टोपले, सचिव प्रा. प्रवीण सावंत आणि खजिनदार शेखर नाईक उपस्थित होते. विद्या म्हाळशेकर यांनी सम्राट विद्यार्थी पुरस्काराची संकल्पना आणि त्याचे महत्व सांगितले.

पुस्कार प्राप्त विद्यार्थी

बिपाशा शर्मा, अनुज शेट्ये, साईशा फुलारी, पूर्वा भिडे, अथश्री कवळेकर, सानिया राऊत, निष्मा इन्सुलकर, सानिषा मळीक, राज पेडणेकर, खुशी मयेकर, तन्वी दळवी, नित्या घाटवळ, रानी साटेलकर, वृंदा सिद्ध्ये, नॅथन फेर्राव, यश कळंगुटकर, मुन्नीकुमारी पासवान आणि मनस्वी वायंगणकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT