Goa Bicholim Dhumal couple Dainik Gomantak
गोवा

Bicholim: '..देवाजीच्या दारी आज रंगला अभंग'! पंढरपूरचे दाम्पत्य गोव्यात दाखल; 25 वर्षांपासून देतेय गणेशभक्तांना सेवा

Ganesh Chaturthi: गोमंतकीयांचा सर्वांत मोठा गणेश चतुर्थी हा सण तोंडावर आला आहे. त्‍यानिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) येथील चर्मवाद्य दुरुस्ती करणारे धुमाळ दाम्‍पत्‍य यंदाही डिचोलीत दाखल झाले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: गोमंतकीयांचा सर्वांत मोठा गणेश चतुर्थी हा सण तोंडावर आला आहे. त्‍यानिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) येथील चर्मवाद्य दुरुस्ती करणारे धुमाळ दाम्‍पत्‍य यंदाही डिचोलीत दाखल झाले असून, त्यांनी आपली कारागिरीही सुरू केली आहे. त्‍यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

सुनील धुमाळ आणि त्‍यांची पत्‍नी मंदा धुमाळ हे दाम्‍पत्‍य दरवर्षी गणेश चतुर्थीपूर्वी एक महिना अगोदर डिचोलीत दाखल होते. मंदा या आपल्‍या नवऱ्याला तेवढीच तोलामोलाची मदत करतात. चतुर्थीचे वेध लागले की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील तंतू आणि चर्मवाद्ये दुरुस्ती करणारे कारागीर गोव्याची वाट धरतात. पंढरपूर येथील हे दाम्‍पत्‍य गेल्या पंचवीस वर्षांपासून डिचोलीत येऊन चर्मवाद्ये दुरुस्ती करत आहे.

चतुर्थी म्हटली की भजन आणि आरत्या आल्याच. त्यासाठी प्रामुख्याने तबला, पखवाज, समेळ आदी चर्मवाद्यांची गरज असते. चतुर्थीपूर्वी ही वाद्ये दुरुस्त करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग असते. सुनील धुमाळ हे कारागीर ही वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईत आहेत. त्यांच्याकडे सध्‍या एवढी वाद्ये दुरुस्‍तीसाठी आली आहेत की त्‍यांना थोडीही उसंत मिळत नाही. आपल्या पत्नीसमवेत ते दुरुस्तीकामात रमले आहेत.

नवऱ्याकडून खूप काही शिकले, मंदा धुमाळ

आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर महिलाही पुढे येत आहेत. काही महिला तर आपल्या पतीच्या हातात हात घालून काम करताना दिसून येतात. याचा प्रत्यय धुमाळ दाम्‍पत्‍याकडे पाहिल्‍यानंतर येतो. वाद्ये दुरुस्ती करण्याचा परंपरागत वारसा नाही की मी प्रशिक्षण घेतलेले नाही. नवऱ्याबरोबर काम करताना अनुभवातून खूप काही गोष्टी शिकून घेतल्या. पखवाज, तबला, ढग्ग्याला शाई लावणे, वाद्या ओढणे आदी कामे मी करते. नवऱ्याला जमेल तशी मदत करते. मालकही आम्हीच आणि गडीही आम्हीच. विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळतो, असे मंदा धुमाळ सांगतात.

चर्मवाद्यांची दुरुस्ती करताना पत्नी मंदाचा मला मोठा आधार मिळतो. दरवर्षी डिचोलीतील गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाद्ये दुरुस्त करून घेण्यासाठी येथील गणेशभक्त माझी वाट पाहत असतात. माझ्याकडे नवीन वाद्येही उपलब्ध असतात. त्‍यामुळे त्‍यांची चांगली सोय होते.

सुनील धुमाळ, कारागीर (पंढरपूर)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT