Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: शहरातील ‘त्या’ पोदेरांवर कारवाई होणार, पालिकेने स्पष्ट केलंय कारवाई मागचं 'हे' कारण

अपघाताचाही धोका

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News डिचोली शहरात गर्दीच्या ठिकाणी उभे राहून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ‘पोदेरां’वर आता कारवाई होणार आहे. डिचोली पालिकेकडून तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शहरात सध्या ‘पदेरां’ची संख्या वाढली आहे.

सायकल किंवा मोटारसायकलवरून हे ‘पोदेर’ रोज सकाळ-संध्याकाळ बाजार परिसर मिळून शहरातील विविध ठिकाणी पाव विक्री करताना आढळून येतात. आश्चर्याची बाब म्हणजे पाव विक्री करणारे सर्व ‘पदेर’ राज्याबाहेरील आहेत.

शहरात पदेरांची संख्या वाढत असली आणि विविध ठिकाणी पोदेर आपला व्यवसाय करीत असले, तरी शहरातील न्यायालय इमारत आणि बाजारात जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर उभे राहून पाव विक्री करणाऱ्या पदेरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत असतो.

बहुतेकजण तर मध्येच वाहने उभी करून पाव खरेदी करताना दिसून येतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतानाच, अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात पाव विक्री करणारे काही ‘पोदेर’ रहदारीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळे एखादेवेळी अपघातासारखा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतीत पालिका गंभीर आहे.

अडथळा निर्माण करणाऱ्या ‘पोदेरां’विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसे निर्देशही मार्केट निरीक्षकांना देण्यात आले आहेत. ‘पोदेरां’नाही त्याची कल्पना देण्यात आली आहे. - कुंदन फळारी, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT