Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market: 'त्या' बेकायदेशीर स्टॉलवरील कारवाई लांबणीवर, विक्रेत्यांचे पालिकेला साकडे

दिवाळीपर्यंत मुदत द्या ः डिचोलीतील कपडे विक्रेत्यांचे पालिकेला साकडे

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Market: कपडे विक्री करणाऱ्या डिचोली बाजारातील ‘त्या’ सहा स्टॉल्स विरोधातील कारवाई लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आम्हाला दिवाळीपर्यंत मुदत द्या, असे साकडे कारवाईची टांगती तलवार असलेल्या स्टॉल्सधारकांनी पालिकेला घातले आहे, तसे निवेदनही या स्टॉल्सवाल्यांनी पालिकेला दिल्याची माहिती आहे.

पालिकेनेही या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन तूर्त या स्टॉलधारकांना दिले आहे. त्यामुळे या स्टॉल्सच्या विरोधातील कारवाई लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

या स्टॉलवाल्यांनी डिचोली पालिकेच्या नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडल्याची माहिती मिळाली आहे. दिवाळीनंतर आमचे सोयीस्कर अशा जागेत स्थलांतर कराव, अशी मागणीही या स्टॉलवाल्यांनी केली असल्याचे समजते.

चतुर्थी आणि दिवाळीनिमित्त आम्ही कर्ज काढून लाखो रुपयांचा माल ऑर्डर केला आहे. अशा अवस्थेत आम्हाला सध्याची जागा सोडावी लागली, तर आमच्या धंद्यावर परिणाम होणार. आम्ही कर्जबाजारी होऊन रस्त्यावर येणार अशी व्यथा या स्टॉलवाल्यांची आहे. दिवाळीपर्यंत सध्याच्याच जागेत आम्हाला ठेवावे, अशी मागणी हे स्टॉलवाले करीत आहेत.

बैठकीत घेतला निर्णय

बाजार संकुल परिसरात एका रांगेत सहा कपड्यांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. ज्याठिकाणी हे स्टॉल उभे आहेत ती जागा पालिकेतर्फे पार्किंगसाठी अधिसूचित करण्यात आली आहे.

गेल्या बुधवारी (ता.२६) झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत बाजार संकुल परिसरातील कपडे विक्रेत्यांचा प्रश्न चर्चेत आला.

एका रांगेत कपडे विक्रेत्यांनी थाटलेले सहाही स्टॉल्स बेकायदेशीर आहेत. हे स्टॉल हटवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे या स्टॉलवर कारवाई अटळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT