Solar Weather Station At IIT Goa: हवामान बदल प्रकल्प सहकार्याचा एक भाग म्हणून, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (CUNY) आणि ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज (BCC) यांनी फार्मगुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC) च्या IIT- गोवा कॅम्पसमध्ये सौर उर्जेवर चालणारे स्वयंचलित हवामान केंद्र मंगळवारी स्थापित करण्यात आले.
गोव्यानंतर नवी मुंबई, पुणे, भोपाळ आणि छत्तीसगड येथील संस्थांमध्ये प्रत्येकी एक आणि गुजरातमध्ये दोन केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
पश्चिम भारतासाठी 40,000 डॉलरच्या अनुदानातून सात हवामान निरीक्षण आणि हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी केंद्रे बनवण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिली यंत्रणा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), गोवा येथे स्थापन करण्यात आली. यामुळे, आयआयटी-गोवा हे अशा प्रकारचे स्टेशन असलेले राज्यातील एकमेव कॅम्पस बनले आहे.
हवामान बदलाचा सामना करण्याच्या उद्देशाने यूएस वाणिज्य दूतावास-अनुदानित प्रकल्पाच्या स्थापना समारंभाला ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेजच्या रसायनशास्त्र, पृथ्वी विज्ञान आणि पर्यावरण विज्ञान विभागाचे अध्यक्ष प्रा. नील फिलिप आणि प्रा. परमिता सेन उपस्थित होते.
ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेजचे विद्यार्थी, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे प्राध्यापक, प्रतिनिधी, मुंबई येथील युएस कॉन्सुलेटचे वरिष्ठ माध्यम सल्लागार कश्यप पंड्या, आयआयटी-गोवाचे संचालक बी. के. मिश्रा, प्रा. शरद सिन्हा आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक,
प्रा.नील फिलिप आणि प्रा. पारमिता सेन यांच्या नेतृत्वाखाली, ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज टीम देशात सौरऊर्जेवर चालणारी स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्याची सुविधा देण्यासाठी स्थानिक समकक्षांसोबत काम करत आहे. ही हवामान केंद्रे हवेची गुणवत्ता आणि जमिनीतील आर्द्रतेवरही लक्ष ठेवतील.
प्रा. सेन म्हणाल्या, आयआयटी-गोवा कॅम्पस हे अशा प्रकारचे स्टेशन बसवणारे पश्चिम विभागातील देशातील पहिले केंद्र आहे. पूर्व विभागात आठ विद्यापीठे किंवा महाविद्यालयांत ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. संपूर्ण देशात अशी केंद्रे उभारली जाणार आहेत.
ही एक उत्तम आणि अचूक प्रणाली आहे. विशेष म्हणजे, हवामान केंद्रांकडून मिळालेला डेटा स्टेकहोल्डर्ससोबत ऑनलाइन आणि स्मार्टफोन अॅप प्लॅटफॉर्मद्वारे आपोआप शेअर केला जाईल. आणि अॅप्स डाउनलोड करून, कोणालाही ही माहिती मिळू शकेल.
प्रणाली बसवण्याव्यतिरिक्त या टीमने हवामान आणि हवामान बदलांवरील ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी सामूहिक सामाजिक शिक्षण आणि थीमॅटिक कम्युनिकेशन कार्यशाळादेखील आयोजित केली होती. तसेच टीमने हवामान बदल आणि पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन उपकरणांच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर केले.
आयआयटी-गोवाचे प्रा. शरद सिन्हा म्हणाले की, निरीक्षण केंद्रांकडील डेटा हवामान बदल आणि हवेच्या गुणवत्तेवर संशोधन करण्यासाठी वापरला जाईल. त्याद्वारे शेतकरी आणि इतर स्थानिक समुदायांशी संपर्क साधण्याचेही नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.