Monsoon Viral Infection Dainik Gomantak
गोवा

Viral infection: गोवेकर हैराण! सर्दी-तापासह ‘डोळे येण्या’ची साथ

लहान मुले बाधित : डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रावर ताण

गोमन्तक डिजिटल टीम

Viral infection डिचोलीतील विविध विशेष करून ग्रामीण भागात संसर्गजन्य पावसाळी आजारांसह ‘डोळ्यां’ची साथ फैलावली असून, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनाही या आजारांची लागण झाली आहे. सध्या उपचारांसाठी डॉक्टरांकडे गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रावरही सध्या ताण वाढला असून, या केंद्रात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत आहे. रोज 300 हून अधिक रुग्ण तपासणीसाठी आरोग्य केंद्रात येत आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

ऊन-पावसामुळे निर्माण झालेल्या असंतुलित आणि बदलत्या वातावरणामुळे पावसाळी आजार फैलावल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

डेंग्यू नियंत्रणात

डिचोलीत पावसाळी आजार फैलावले असले, तरी डेंग्यू, मलेरिया यासारखे भयानक आजार नियंत्रणात आहेत, अशी माहिती डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातून उपलब्ध झाली आहे. महिन्यापूर्वी डिचोलीत डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना डिचोलीबाहेर या साथीची लागण झाली होती, अशी माहितीही आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

बदलत्या हवामानामुळे संसर्गजन्य पावसाळी आजार फैलावले असले, तरी जनतेने घाबरता कामा नये. हे आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित उपचारासाठी पुढे यावे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ‘डोळे येणे’ या विकाराची लहान मुलांना अधिक लागण होत आहे.

- डॉ. मेधा साळकर, आरोग्य अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्त्रियांवर होणारे अत्याचार कधी थांबणार? कुडचडेच्या घटनेने समाजाचा चेहरा विद्रूप; खापर फोडण्यात आपण 'माहीर', पण जबाबदारी कुणाची?

भळभळती आठवण- संपादकीय

24 एप्रिलपर्यंत खट्टरला अटक करा! सरदेसाईंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसापूर्वी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार!"

Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

खोटा जबाब, बनावट आरोप आणि प्रियकराला तुरुंगाची हवा! लग्नासाठी बलात्काराच्या खोट्या तक्रारीचा 'ट्रॅप'? 'पोक्सो' कोर्टाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT