Goa News | Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: भुईपाल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वासरे, कुत्र्यांचा फडशा

वन खात्याने पिंजरा लावावा: पंच सदस्य स्मिता मोटे यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard In Goa होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल प्रभाग ९ मध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांची गुरे वासरे, कुत्र्यांचा फडशा पाडला जात असल्याच्या तक्रारी वाढलेल्या असून वन खात्याने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन बिबट्याचा जेरबंद करून बंदोबस्त करावा,अशी मागणी स्थानिक पंचायत सदस्य स्मिता मोटे यांनी केली आहे.

बुधवार,१६ रोजी रात्री भुईपाल चेकपोस्ट भागातील धाकटू दवणे या शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश करून सदर बिबट्याने एक वासरू ठार मारले, तर अन्य एका वासराला जखमी केले आहे.

या घटनेची माहिती दवणे यांनी भुईपाल येथील वन रक्षकाला दिल्यानंतर होंडा येथील पशुचकित्सा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारे बिबट्याने भुईपाल प्रभाग ९ मध्ये धुमाकूळ घातल्याने या परिसरात दहशत आहे. वाळपई वनअधिकारी शामसुंदर गावस यांना सदर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्मिता मोटे यांनी केली आहे.

दोन महिन्यांपासून दहशत

गेल्या दोन महिन्यांपासून भुईपाल चेकपोस्ट, डोबवाडा, भेडशेवाडा परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे, यामध्ये भेडशेवाडा येथील महानंद कोलाप्टे यांच्या मालकीचे चार कुत्रे बिबट्याने उचलून नेले होते.

तसेच चेकपोस्ट परिसरात सुनील बाजारी यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. या प्रमाणे डोबवाडा येथील काही जणांच्या कुत्र्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार राणेंकडून दखल

दरम्यान, या प्रकरणाची दखल पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी घेऊन त्याठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याचे आदेश वाळपई वन विभागाला देताच त्याच्याने वाळपई वन विभागाचे अधिकारी महादेव गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

या विषयी आमदार डॉ.दिव्या राणे यांनी तातडीने दखल घेतली असल्याने पंच स्मिता मोटे यांनी त्यांचे व व खात्याचे आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ढिंग टांग: ट्रम्प कहीं नहीं जाएगा..!

India New Visa Rules 2026: परदेशी पर्यटकांसाठी खूशखबर! भारतातील व्हिसा प्रक्रिया होणार अत्यंत सोपी आणि वेगवान; केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

VIDEO: खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक, स्टाफ अन् बॉल बॉयही भिडले! LIVE सामन्यात तुफान हाणामारी; रेफ्रीने दाखवली तब्बल 51 रेड कार्ड

Gangotri Highway Accident: गंगोत्री महामार्गावर कारचा ताबा सुटला अन् थेट नदीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू; उत्तरकाशीत भीषण अपघात VIDEO

Cadbury Chocolate History: 'कुछ मीठा हो जाये'मागची संघर्षकथा! कॅडबरीच्या जागतिक उद्योगप्रवासाचा रंजक उलगडा

SCROLL FOR NEXT