Subhash Faldesai  Dainik Gomantak
गोवा

भगवती पठार ठरणार रोजगार निर्मितीचे केंद्र; IITसह 'हा' प्रकल्प आहे प्रस्तावित

या पठारावर फिल्म सिटी साठीही विचार होऊ शकतो, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhagwati Plateau लोलये, पैंगीण, सांगे असा प्रवास करून आयआयटी पुन्हा लोलये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मंत्री सुभाष फळदेसाई, अधिकारी तसेच लोलये कोमुनिदादचे पदाधिकारी भूषण प्रभूगावकर यांनी प्रस्तावित कोमुनिदाद जागेची पाहणी केली.

यापूर्वी भगवती पठारावर आयआयटी उभारण्यास विरोध झाल्यानंतर पैंगीण पंचायत क्षेत्रातील कुळटी पठाराचा विचार चालला होता, त्यानंतर सांगे येथे आयआयटी उभारण्यासाठी फळदेसाई यांनी प्रयत्न चालविले, मात्र त्या ठिकाणीही या प्रकल्पाला प्रखर विरोध झाला.

मात्र प्रदूषण विरहीत प्रकल्पासाठी दक्षिण गोव्यात जागा पाहण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. भगवती पठाराचा आयआयटीसाठी फेर विचारही होऊ शकतो, त्याचप्रमाणे या पठारावर फिल्म सिटी साठीही विचार होऊ शकतो, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

काणकोण मतदारसंघातील वाढत जाणार रोजगाराचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी लोकांनी वेळोवेळी सरकारकडे केली होती.

त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न सुरू केले असून काणकोण येथील लोलये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर चांगला उद्योग किंवा शैक्षणिक प्रकल्प आणल्यास तो काणकोण मतदारसंघातील युवकांसाठी रोजगारासाठी एक चांगली संधी प्राप्त होऊ शकते, यासाठी सरकार हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

भगवती पठारावर नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास न करता लोकांना फायदेशीर ठरणार प्रकल्प चालीस लावल्यास या पठाराचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे सरकारचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

स्वतःची कविता वाचली, म्हणे गंगेत घोडं न्हालं! कविसंमेलनात कवितेला खरेच महत्त्व उरलेय?

कोकणात जाळपोळ केली, पावसाळ्यात तुर्क माघारी फिरले आणि मराठ्यांनी त्यांना कापून काढले; बहमनी सैन्य 'गोव्या'वर आक्रमण करण्यास निघाले..

SCROLL FOR NEXT