Kudal Verna : कुडाळ-वेर्णा रेल्‍वेमार्गावर बुधवारी 3 तास मेगा ब्लॉक

प्रवासी रेल्वेंवर परिणाम होणार असल्याचे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.
Kudal Verna
Kudal Verna Dainik Gomantak
Published on
Updated on

Kudal Verna : दुरुस्तीचे काम करावयाचे असल्‍याने संगमेश्‍‍वर रोड ते भोके रेल्वे मार्गावर मंगळवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असे तीन तास मेगा ब्लॉक पाळला जाणार आहे. तसेच कुडाळ ते वेर्णा रेल मार्गावर बुधवार दि. १२ जुलै रोजी संध्याकाळी ३ ते ६ या वेळेत मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे काही प्रवासी रेल्वेंवर परिणाम होणार असल्याचे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

संगमेश्र्वर ते भोके मेगा ब्लॉकमुळे ११ रोजी रेल्वे क्रमांक १९५७७ तिरुनावेली ते जामनगर एक्सप्रेस, जिचा प्रवास १० जुलै रोजी सुरू होणार आहे, ती ट्रेन ठोकूर ते रत्नागिरीदरम्यान अडीच तासांसाठी नियमन केले जाईल. ट्रेन क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस, जिचा प्रवास १० जुलै रोजी सुरू होणार आहे ती ठोकूर तिचे रत्नागिरीदरम्यान एका तासासाठी नियमन केले जाईल.

Kudal Verna
Goa Monsoon 2023: मांद्रेत 400 वर्षांचे पिंपळाचे झाड कोसळले

ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा ते सावंतवाडी एक्सप्रेस, जिचा प्रवास १२ जुलैला सुरू होणार आहे, ती रोहा-कणकवली यादरम्यान ५० मिनिटांसाठी रोखली जाणार आहे. ट्रेन क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम ते निझामुद्दीन एक्सप्रेस, जिचा प्रवास ११ जुलैला सुरू होणार आहे, तिचे नियमन ठोकूर ते वेर्णादरम्यान २ तास ५० मिनिटांसाठी केले जाईल. प्रवाशांनी या बदलांची दखल घ्यावी असे रेल्वेतर्फे कळिण्यात आले आहे.

Kudal Verna
Goa Tourism - Digital Nomad संकल्पनेतून गोव्याच्या पर्यटनाला मिळेल चालना - रोहन | Gomantak Tv

जनशताब्दी’चा थिवीत मुक्काम

कुडाळ ते वेर्णा मेगा ब्लॉकमुळे १२ जुलै रोजी ट्रेन क्रमांक १२०५१ मुंबई सीएसटी ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, जिचा प्रवास १२ जुलै रोजी सुरू होत आहे तिचे नियमन थिवी स्टेशनवर तीन तासांसाठी केले जाईल. त्याचप्रमाणे १२६१८ एच निझामुद्दीन ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस, जिचा प्रवास ११ जुलै रोजी सुरू होणार आहे, तिचे रोहा-कुडाळदरम्यान अडीच तासांसाठी नियमन केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com