Chapora Jetty Dainik Gomantak
गोवा

Chapora Jetty: मच्छीमारांची आधारस्तंभ असलेली जेटी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; दुर्घटना घडण्याच्या शक्यतेने भीतीचे वातावरण

बेती जेटीवर परप्रांतीयांचे वर्चस्व असल्याने मासेमारी करण्यासाठी शापोरा जेटीशिवाय स्थानिकांना दुसरा पर्याय राहिलेला नाही - सुरेंद्र गोवेकर

गोमन्तक डिजिटल टीम

Chapora Jetty बार्देश तालुक्यातील महत्त्वाच्या बेती या जेटीनंतर ‘स्थानिक मच्छीमारांची जेटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शापोरा जेटीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या जेटीची लवकरात लवकर दुरुस्ती न केल्यास याठिकाणी एखादा भयंकर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हणजूण कायसूवचे पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले.

विनोद पालयेकर हे मच्छीमार मंत्री असताना येथील जेटीची दुरुस्ती करण्याबरोबरच सर्वसोयींनी युक्त असे मच्छीमार केंद्र उभारण्यासाठी दोन वेळा पायाभरणी करण्यात आली होती.

मात्र, ते मंत्रिपदावरून पायउतार होताच शापोरा जेटीची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या जेटीकडे अजून कुण्या मंत्र्यांचे लक्ष गेलेले नाही. आता या जेटीची अवस्था ‘ना घरका, ना घाटका’ झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

यासंदर्भात, शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर म्हणाले की, सध्या जेटीची दुरवस्था झालेली आहे. सरकारने या जेटीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. मच्छीमारांसाठी कोट्यवधींच्या योजना आखण्याच्या विचारात सरकार आहे.

मात्र, मच्छीमारांना आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. आम्ही गेली कित्येक वर्षे सरकारदरबारी खेपा मारल्या. सरकारपर्यंत हा विषय पोहचविण्याचा प्रयत्न केला. सध्या विद्यमान मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे.

पोर्तुगीज काळात पुर्वजांनी सुरू केलेल्या तारवां व्यवसायापासून ते आताच्या ट्रॉलर व्यवसायापर्यंत येथील जेटीशी आमचे पूर्वापार संबंध राहिलेले आहेत. या भागातील स्थानिक तसेच पारंपरिक मच्छीमारांसाठी त्यांच्या व्यवसायात आधारस्तंभ बनलेल्या येथील जेटीची सध्याची अवस्था पाहून मन भरून येते.

जवळच्या बेती जेटीवर परप्रांतीयांचे वर्चस्व असल्याने मासेमारी करण्यासाठी शापोरा जेटीनंतर स्थानिकांना दुसरा पर्याय राहिलेला नसल्याने लवकरात लवकर येथील जेटीची दुरुस्ती करायला हवी. - सुरेंद्र गोवेकर, स्थानिक पंचसदस्य

आजकाल स्थानिकांचे व्यवसाय बहुतेक परप्रांतीयांच्या घशात गेलेले आहेत. निदान मासेमारी हा आपला पारंपरिक व्यवसाय तरी इतरांच्या कब्जात जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलावीत. येथील समस्येकडे विद्यमान मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी जातीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा. - वासुदेव वळवईकर, व्यावसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

Two US Navy Aircraft Crash : 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

Prithvi Shaw Double Century: 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

SCROLL FOR NEXT