Betalbatim Beach Dainik Gomantak
गोवा

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Goa Lifeguard Rescues Tourist: गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक (Lifeguards) तैनात असतात.

Manish Jadhav

Goa Lifeguard Rescues Tourist: गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक (Lifeguards) तैनात असतात. मात्र, अनेक वेळा पर्यटक त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्याच मस्तीत समुद्रात उतरतात, ज्यामुळे अपघात घडतात. बेताळभाटी समुद्र किनाऱ्यावर अशीच एक घटना घडली, जी धक्कादायक आणि त्याचवेळी बोध देणारी आहे. एका पर्यटकाने जीवरक्षकाच्या इशाऱ्याकडे केवळ दुर्लक्षच केले नाहीतर त्याला धक्काबुक्की करुन समुद्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र थोड्याच वेळात तो समुद्रात बुडू लागला असता त्याच जीवरक्षकाने त्याचा जीव वाचवला.

नेमके काय घडले?

बेताळभाटी समुद्रकिनाऱ्यावर ही धक्कादायक घडली. समुद्र खवळलेला असल्याने जीवरक्षकांनी धोकादायक भागांमध्ये लाल झेंडे (Red Flags) लावले होते. त्याचवेळी, एक पर्यटक या भागातून समुद्रात जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तिथे तैनात असलेल्या जीवरक्षकाने त्याला थांबवले आणि लाल झेंड्यांचा इशारा दिला. त्याने पर्यटकाला (Tourist) समुद्रात न जाण्यास सांगितले, पण पर्यटकाने जीवरक्षकाचा इशारा ऐकला नाही. उलट तो त्याच्याशी हुज्जत घालू लागला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पर्यटकाने जीवरक्षकाला धक्काबुक्की केली आणि 'मला काहीही होणार नाही' असे म्हणत समुद्रात जावू लागला.

तोच जीवरक्षक देवदूत बनून आला

पण खवळलेल्या लाटांनी त्याला लगेच आपल्या कवेत घेतले. काही क्षणातच तो बुडू लागला आणि मदतीसाठी ओरडू लागला. जीवरक्षकाने कोणताही विचार न करता तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली. अथक प्रयत्नांनी जीवरक्षकाने त्याला किनाऱ्यावर आणले. त्यानंतर लगेच पर्यटकाला प्राथमिक उपचार दिले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा जीवरक्षकांचे महत्त्व अधोरेखित झाले. जीवरक्षक हे आपल्या सुरक्षेसाठी समुद्राच्या किनाऱ्यांवर असतात. त्यांचे इशारे आणि लाल झेंडे हे धोक्याची सूचना देतात. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या नियमांचे पालन करणे हे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. जीवरक्षक वाद घालण्यासाठी नाहीतर आपला जीव वाचवण्यासाठी तिथे असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

SCROLL FOR NEXT