Goa Sunburn Court Decision Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn: ‘सनबर्न’मधील ध्वनिप्रदूषण, ड्रग्सचा वापर; जनहित याचिकेवर होणार सुनावणी, गोवा सरकारच्या भूमिकेवर लक्ष

Goa Sunburn Festival 2024: राज्यात दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस होणारा सनबर्न ईडीएम महोत्सव धारगळला आयोजित करण्यास स्थानिकांचा जोरदार विरोध असतानाच पंचायतीने तत्त्वतः परवाना तथा नाहरकत दाखला (एनओसी) देण्याचा निर्णय झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival 2024 Hearings

पणजी: राज्यात दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस होणारा सनबर्न ईडीएम महोत्सव धारगळला आयोजित करण्यास स्थानिकांचा जोरदार विरोध असतानाच पंचायतीचा तत्त्वतः परवाना तथा नाहरकत दाखला (NOC) देण्याचा निर्णय झाला आहे.

त्याला आव्हान दिलेली याचिका तसेच या महोत्सवावेळी ड्रग्सची विक्री आणि ध्वनिप्रदूषण यांमुळे होणारा परिणाम यासंदर्भात सादर केलेली जनहित याचिका यावर एकत्रित सुनावणी , सोमवारी (९ रोजी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे धारगळवासीयांचे लक्ष लागले आहे.

सनबर्न महोत्सवाला विरोधी व समर्थक असे दोन गट धारगळ'मध्ये तयार झाले आहेत. उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जनहित याचिकेवरील मागील सुनावणीवेळी सरकारने तसेच धारगळ पंचायतीने सनबर्न ईडीएम महोत्सवाला परवानगी दिलेली नाही, असे सांगितले होते. या महोत्सवासंदर्भात सरकार किंवा पंचायत काय निर्णय घेते, यासाठी खंडपीठाने त्यावरील सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत तहकूब केली होती.

धारगळ पंचायतीने २ डिसेंबरला घेतलेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत ९ पंचसदस्यांपैकी ५ जणांनी ना हरकत परवाना किंवा तात्पुरता परवाना देण्यास संमती दर्शविली. या निर्णयाची प्रत धारगळ पंचायतीकडे मागूनही ती दिली नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

धारगळ पंचायतीने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रामसभा बोलावली होती. त्यावेळी धारगळ पंचायत क्षेत्रात सनबर्न महोत्सव आयोजनास एकमताने लोकांनी विरोध करण्याचा ठराव घेतला होता. या ग्रामसभेला या महोत्सवामुळे ज्यांना त्रास होणार आहे, त्यातील ९२ जण उपस्थित राहिले होते.

१ डिसेंबर २०२४ रोजी विरोध दर्शविण्यासाठी धारगळसह पेडणे तालुक्यामधील सुमारे ३ हजार ग्रामस्थ पंचायतीसमोर जमा झाले होते आणि त्यांनी निदर्शने केली होती. तथापि, या महोत्सवाला समर्थन देणाराही गट तयार झाल्याने विरोधकांची अडचण झाली आहे.

सरकारची भूमिका निर्णायक

या दोन्ही याचिका भरत बागकर यांनी सादर केल्या आहेत. धारगळ पंचायत मंडळाने हल्ली सनबर्न ईडीएम महोत्सवाला ना हरकत दाखल्यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी ५ विरुद्ध ४ मतांनी हा ठराव संमत झाल्यामुळे परवानगी देण्याचा निर्णय झाला होता.

या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बागकर यांनी सादर केली आहे. दोन्ही याचिकांमध्ये सरकार व पंचायतीला प्रतिवादी केले आहे. त्यामुळे सरकार कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT