Traffic Jam Canva
गोवा

Porvorim Flyover Construction : 'पर्वरी'तील समस्यांबाबत गोवा खंडपीठ गंभीर! संबंधितांची घेतली बैठक; सविस्तर माहिती देण्याचे आदेश

Goa Bench Serious on Porvorim issues : मोसेस पिंटो यांनी सादर केलेली जनहित याचिका आज खंडपीठासमोर सुनावणीला आली असता धूळप्रदूषण, वाहतूक समस्या, रस्त्यांची सद्यःस्थिती याबाबत ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Flyover Construction Traffic Issue

पणजी: पर्वरी महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी होत असलेले धूळप्रदूषण तसेच वाहतुकीच्‍या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक खाते तसेच कंत्राटदारांची संयुक्त बैठक घेऊन त्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देत जनहित याचिकेवरील सुनावणी १२ डिसेंबरला ठेवली आहे.

मोसेस पिंटो यांनी सादर केलेली जनहित याचिका आज खंडपीठासमोर सुनावणीला आली असता धूळप्रदूषण, वाहतूक समस्या, रस्त्यांची सद्यःस्थिती याबाबत ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी माहिती दिली. धूळप्रदूषण रोखण्यासाठी दिवसातून चारवेळा पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. असेही त्‍यांनी सांगितले.

सविस्‍तर माहिती सादर करा

या बैठकीत रस्त्यावरील वाहतूक सिग्नल, धूळप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जे काही पर्याय असतील, त्याची कशा प्रकारे अंमलबजावणी करता येईल, याची सविस्तर माहिती सादर करण्यास खंडपीठाने सांगितले आहे.

रुग्णवाहिकेसाठी रस्ता

या मार्गावर अपघात घडल्यास रुग्णवाहिकेला जाण्यासाठीच्या रस्त्यांबाबतही न्यायालयाने माहिती जाणून घेतली. जखमींना त्वरित उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकेस कोणत्याही अडचणीविना जाण्यास कशा प्रकारे रस्ता उपलब्ध केला जाईल, त्यासाठी कोणते पर्याय असतील याबाबत वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक खाते व कंत्राटदार यांच्यात होणाऱ्या संयुक्त बैठकीत चर्चा होऊन पर्याय काढण्यात यावा, असे सुचविण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

SCROLL FOR NEXT