Mumbai High Court Dainik Gomantak
गोवा

Mumbai High Court: गोवा सरकारचे न्यायालयाने उपटले कान!

Mumbai High Court: दिवाणी न्यायालय इमारत प्रकरणाची पुढील सुनावणी 11 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai High Court: मडगाव मोडकळीस आलेली इमारत आणि गळके छप्पर यांमुळे पावसाळ्यात चर्चेत आलेल्या मडगाव येथील दिवाणी न्यायालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम निदान 15 ऑक्टोबरपासून सुरू करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी दिले.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 ऑक्टोबर रोजी ठेवली असून निदान तोपर्यंत तरी कामाचे आदेश जारी करा, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. मडगाव येथील प्रथमवर्ग तसेच दिवाणी न्यायालये ज्या इमारतीत चालतात, तिला पावसाळ्यात गळती लागल्याने पाण्याच्या धारा न्यायकक्षात कोसळू लागल्या. त्यावेळी हा चर्चेचा विषय बनला होता.

तसेच, प्रसार माध्यमांनीही तो मुद्दा उचलून धरल्याने सरकारची नाचक्की झाली. यासंबंधी दक्षिण गोवा वकील संघटनेने उच्च न्यायालयाला जे पत्र लिहिले, त्याची स्वेच्छा दखल घेत न्यायालयाने ती जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली होती. याप्रकरणी दक्षिण गोवा वकील संघटनेने स्वतःला याप्रकरणी हस्तक्षेप वादी म्हणून नोंद करून घेतली होती.

कंत्राटदार आहे, पण आदेश नाही

न्या. महेश सोनक आणि न्या. भरत देशपांडे यांच्या पीठासमोर मंगळवारी ही सुनावणी आली असता, सरकारची बाजू मांडणारे ॲड. मनीष साळकर यांनी या पुरातन इमारतीच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.

मात्र, अजून त्यांना आदेश न दिल्यामुळे काम सुरू होऊ शकलेले नाही, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कायदा सचिवांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना पीठाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT