Goa Bench Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: बेकायदा डोंगरफोडीबद्दल २० लाख जमा करा; कोर्टाचा दणका

Illegal Construction At Taleigao: मालकाच्या सुरक्षा ठेवीचे ५० लाख रुपये न्यायालयाने जप्त केले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

ताळगाव येथील बेकायदा डोंगरफोड करून बांधकाम केलेल्या बंगल्याच्या मालकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सहा आठवड्यात २० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. डोंगरफोड केलेला परिसर पूर्वस्थितीत करण्यास सुमारे १.४० कोटी रुपये येणार असल्याचा अंदाजित आराखडा पीडब्ल्यूडी खात्याने सादर केला आहे. आत्तापर्यंत मालकाची सुरक्षा ठेवीची ५० लाख रुपये न्यायालयाने जप्त केले आहेत व त्याशिवाय ही २० लाखाची रक्कम भरण्यास सांगितले आहे.

ताळगाव येथील डोंगरफोड करून इस्टोनिया फ्रांसिस्को दी आल्मेदा याने अलिशान बंगल्याचे काम केले आहे. यासंदर्भातची याचिका माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी २०२२ साली सादर केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीरपणे डोंगरफोड केलेली जागा पूर्वस्थितीत करण्याचे निर्देश दिले होते.

त्यासाठी त्याला यापूर्वी ५० लाखांची सुरक्षा ठेव न्यायालयात जमा करण्यास सांगितले होते. डोंगरफोड केलेला परिसर पूर्वस्थितीत करण्यासाठी येणारा खर्च या संदर्भातचा आराखडा पीडबल्यूडीला तयार करण्यास सांगितले. बंगल्याच्या मालकाने हे काम स्वतःहून करावे असे स्पष्ट केले होते.

बंगला मालकाला रक्कम जमा करावी लागणार

ही सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आली असता बंगल्याच्या मालकातर्फे वकिलांनी बाजू मांडताना त्याच्याकडे जमा करण्यासाठी रक्कम नसल्याचे सांगितले मात्र ही रक्कम मालकाला जमा करावीच लागेल असे खंडपीठाने स्पष्ट केले. शक्य नसल्यास त्यांचा बंगला ताब्यात घेतला जाईल अशी ताकीद दिली. जोपर्यंत ही रक्कम जमा केली जाणार नाही तोपर्यंत सर्वे क्रमांक २७५/१ व सर्वे क्रमांक २७६/६ तसेच बंगला असलेली मालमत्ता विकता येणार नाही असे स्पष्ट करत ही सुनावणी ३ सप्टेंबरला ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT