GOA-Belgaum National Highway Dainik Gomantak
गोवा

GOA- बेळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद

महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक यल्‍लापूर मार्ग कारवारहून गोव्याकडे (Goa) वळवली.

दैनिक गोमन्तक

रामनगर-अनमोड: महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी रामनगर पोलिसांनी बॅरिकेडस् लावून रामनगरमध्ये हा महामार्ग बंद केला. महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक यल्‍लापूर मार्ग कारवारहून गोव्याकडे (Goa) वळवली. (GOA-Belgaum National Highway closed)

गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्ग 4 A चा कॉट्रॅक्ट भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉनने घेतला होता. दरम्यान खानापूर ते अनमोड घाट, कर्नाटक सीमेपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

रामनगरहून अस्तोली पूल बरलकोड (तिनईघाट) टोल नाका, गुळगुंडा, हत्ती ब्रीज जळकट्टी व कॅसलरॉक फाट्याजवळ या महामार्गाचे काम अर्धवट राहिल्याने पाऊस पडल्यावर येथे वाहन चालवतांना अडचणी निर्माण होत आहे. या महामार्गाचे 80 टक्के काम झाले आहे. तर, 20 टक्के काम बाकी राहिले आहे. या राहिलेल्या कामामुळे येथे मोठमोठ्या खड्ड्यात अवजड वाहनांना अडचणी येतात आणि ते तेथेच अडकून पडतात. यामुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन परिणामी वाहतूक ठप्प होत आहे.

कारवार जिल्हिाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार या महामार्गा येणारी अवजड वाहने अडवण्यात आली तर चारचाकी वाहनांना रामनगर तिनईघाटहून मारसागळमार्गे अनमोडला वळवण्यात आली आहे. सध्या या भागात पावसाने विश्रांती घेतल्याने वाहने अजचणी शिवाय पुढे जात आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक कार्यकर्ते आ. आर. व्ही. देशपांडे यांनी आवाज उठवल्यानंतर खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर ते अनमोडपर्यंतच्या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी 4 कोटी 90 लाख रुपये मंजूर केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT