सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे गोवा बेळगाव मार्गावर असणाऱ्या चोर्ला घाटातील अनेक दरडी कोसळल्या असून रस्ता पूर्णपणे बंद झालाआहे.त्यामुळे गोवा बेळगाव मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ( chorla ghat connecting belgaum to sankhali goa )
काल रात्रीपासून या भागातील पावसाचा जोर कायम आहे. आणि या पावसामुळे या रस्त्यावरील अनेक दर्दी कोसळून रस्त्यावरती आल्या आहेत. आणि आता सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे या दरडी हटविण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे मात्र या मार्गावरील अनेक ठिकाणी या दरडी कोसळल्याने रस्ता खुला होण्यास बराच वेळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान या मार्गावर कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची रांगा लागल्या असून दोन्ही बाजूने प्रवासी व इतर मालवाहू ट्रक अडकून पडले आहेत.
पावसाळ्यात चोर्ला घाटातील दरडी कोसळणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. गेले अनेक वर्षे पावसाळ्यात या मार्गावरील दरडी कोसळून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याचे प्रकार सुरू असतात. यंदा यांचा कित्ता गिरवत मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत . त्यामुळे हा मार्ग पुन्हा वाहतुकीस असुरक्षित व बेभरावंशाचा झालेला दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.