CM Pramod Sawant Inaugurated Vidya Samiksha Kendra Dainik Gomantak
गोवा

Vidya Samiksha Kendra: राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर नजर : मुख्यमंत्री

विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन : अंगणवाड्या, शैक्षणिक संस्थांची नोंदणी अनिवार्य

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant Inaugurated Vidya Samiksha Kendra: राज्यातील सुमारे २ लाख विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकांच्या कामगिरीवर विद्या समीक्षा केंद्राद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पर्वरी येथील या केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे, शंभू घाडी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० साठी संपूर्ण शैक्षणिक स्थितीचे अवलोकन केले जाणार आहे. केंद्राद्वारे दर १५ दिवसांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे, असेही सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या केंद्रातून राज्यातील कोणत्याही शाळेवर लक्ष ठेवता येणार आहे. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम शिकवला म्हणजे काम झाले, असा विचार करू नये.

त्यांनी सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची, कौशल्य विकसित करण्याची तसेच करिअरबाबत माहिती देण्याची गरज आहे.

राज्यातील सर्व बालवाडी व शैक्षणिक संस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत नोंदणी करणे सक्तीचे आहे. काही लोक नोंदणीशिवाय अशा संस्था सुरू करतात. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही.

नोंदणी असेल तरच शाळांना मान्यता देण्यात येईल. पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी सरकारी शाळांची दुरुस्ती आतापासूनच हाती घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गुण कौशल्याला प्रोत्साहन

विद्या समीक्षा केंद्रामार्फत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा कौशल्य गुणांचा विकास व्हावा आणि शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन व्हावे, यासाठी या केंद्राची उभारणी केली आहे.

गुजरातनंतर गोवा हे अशा प्रकारच्या सुविधा उभारणारे देशातील दुसरे राज्य आहे. यासाठी स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंगने पुढाकार घेतला आहे.

अशी होणार समीक्षा

  • अभ्यासक्रमातील विषय विद्यार्थ्यांना समजले की नाही?

  • किती विद्यार्थ्यांना समजले?

  • विद्यार्थ्यांना कोणता विषय अवघड जातो?

  • शिक्षक शिकवण्यात कमी पडतात का?

  • विद्यार्थी समजून घेण्यात कमी पडतात का? याची समीक्षा या केंद्रामार्फत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: पंतप्रधान मोदींनी दिल्या गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Cabo De Rama Khol: ‘खोल’ टेकडीचा 2012 पासून खुलेआम विध्वंस! प्रशासन गांधारीच्‍या भूमिकेत; CRZ प्राधिकरणाच्‍या प्रकार लक्षात आणूनही दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT