Drishti Marine Dainik Gomantak
गोवा

Drishti Marine : ‘दृष्टी’चे श्वानही वाचवणार आता लोकांचा जीव!

‘पॉ स्क्वॉड’ला प्रशिक्षण : मान्सूननंतर श्‍वानपथक बचावकार्यात; ‘स्विम विथ लाइफसेव्हर्स’ उपक्रम पुन्हा सुरू

दैनिक गोमन्तक डिजिटल

समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षा उपयांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी पर्यटन विभागाने दृष्टी मरीनसोबत गोव्यातील किनाऱ्यांवरील जोखीम-प्रवण क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या तैनातीसह प्रशिक्षित श्वानांचे ‘पॉ स्क्वॉड’ तयार केले आहे.

‘दृष्टी’ने आता एक पाऊल पुढे टाकत किनांऱ्यावर बुडणाऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रशिक्षित श्वानांचे ‘पॉ स्क्वॉड’ मदत करणार आहे. येत्या मान्सूननंतर या श्वानांचा वापर बचाव व सुरक्षा कार्यात जीवरक्षकांना मदत करण्यासाठी केला जाईल. शुक्रवारी (ता.28) पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत कांदोळी किनाऱ्यावर याविषयी माहितीसोबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

‘स्विम विथ लाइफसेव्हर्स’ हा उपक्रम मार्च 2021मध्ये दृष्टी मरीनने गोव्यात सुरू केलेला होता. समुद्रात पोहण्याबद्दल उपयुक्त टिप्स देण्या साठी हा कार्यक्रम होता. हा उपक्रम मिरामार, बाणावली, कोलवा व कांदोळी या किनाऱ्यांवर शुक्रवारी पुनरुज्जीवित करण्यात आला.यावेळी जीवरक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

‘एआय’ आधारीत रोबोट तैनात

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित ऑरस नावाचा रोबोट गोव्यातील किनाऱ्यावर याआधीच तैनात केला आहे. हा रोबोट जीवरक्षकांप्रमाणेच लोकांचा जीव वाचवण्यास मदत करतो. ऑरस हा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा सेल्फ ड्रायव्हिंग रोबोट. हा रोबोट एआय या सिस्टीमवर आधारित आहे. ऑरस हा किनाऱ्यावर गस्त घालून भरतीच्या वेळी पर्यटकांना सतर्क करतो.

आशियात पहिले

  • दृष्टी’ ने किनाऱ्यावर श्वानांचा वापर जीवरक्षक म्हणून करण्याचे पाऊल उचलले आहे. आशियातील पहिल्याच उपक्रमाची अंमलबजावणी गोव्यातून होत आहे.

  • 11 श्वानांचा यात समाविष्ट आहे. हे पथक समुद्रात अडकलेल्यांना शोधणे, विशेषतः खडकाळ भागात बचाव कार्य करेल.पथकात भटक्या कुंत्र्यांचा समावेश आहे.

  • हे ‘पॉ स्क्वॉड’ प्रथम उच्च घनतेच्या किनाऱ्यावर तैनात केले जातील. हे श्वान पथक अर्जुन शॉन मैत्रा या तज्ज्ञ डॉग ट्रेनरच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहे.

  • ‘दृष्टी’ने २००८पासून गोव्यात ऑपरेशन सुरू केले. या सेवेमुळे बुडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये ९९ टक्के घट झाली आहे. आतापर्यंत ६६०० हून अधिक जीव वाचविले गेलेत.

"पुढील तीन महिन्यांत आम्ही योग्य कार्यपद्धती घेऊन येऊ, जेणेकरुन पुढील हंगामात किनारी व्यवस्थापन, स्वच्छता, पाळत ठेवणे या दृष्टीने वाटचाल करता येईल. तसेच पर्यटकांनी समुद्रावर जबाबदारीने वागले पाहिजे. नो स्विमिंग झोन फलक लावूनही काहीजण तिथे जातात. हे प्रकार थांबले पाहिजेत."

रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT