swimming zones goa Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्यातील 'या' किनाऱ्यांवर महिलांसाठी स्वतंत्र जलतरण क्षेत्र; वाढत्या गैरवर्तनामुळे प्रशासनाचा उपाय

goa beach swimming zones: राज्यात महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी आता गोव्यातील अनेक प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर केवळ महिलांसाठी जलतरण क्षेत्रं तयार करण्यात आली आहेत.

Akshata Chhatre

पणजी: गोवा हे पर्यटनाचे केंद्रस्थान आहे. दरवर्षी अनेक पर्यटक गोव्यातील किनाऱ्यांना भेट देत असतात, यामध्ये अनेकवेळा महिला पर्यटकांचा देखील समावेश असतो, मात्र गोव्यातील महिला पर्यटकांना छेडछाड आणि इतर गैरसोयीच्या अनुभवांना तोंड द्यावं लागत असल्याने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्यात महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी आता गोव्यातील अनेक प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर केवळ महिलांसाठी जलतरण क्षेत्रं तयार करण्यात आली आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही योजना दृष्टी मरीन लाईफगार्ड एजन्सीच्या नेतृत्वाखाली आणि राज्य पर्यटन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलीये. गेल्या अनेक दिवसांपासून महिला पर्यटकांकडून किनारपट्टीला भेट देताना होणारी छेडछाड, वाईट नजर आणि परवानगीशिवाय फोटो काढणं यांसारख्या घटनांच्या तक्रारी नोंदवल्या जातायत. किनाऱ्यांवरील अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय.

खरंतर समुद्रकिनारे निवांतपणासाठी ओळखले जातात मात्र या किनाऱ्यांवर काही पुरुष पर्यटकांकडून गैरवर्तन वाढले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही महिलांनी त्यांच्या अनुभवांबद्दल अनेक पोस्ट केल्या आहेत, ज्यात अनेकदा पुरुषांकडून सेल्फी काढण्याच्या बहाण्याने किंवा स्विमवेअरमधील महिलांजवळ फिरून त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार अनेक महिलांनी त्यांना त्रास झाल्याचं तक्रारींमधून सांगितलं आहे. एका महिलेने रेडिटवर आपला अनुभव सांगताना म्हटलं की, हडफडे किनाऱ्यावर असताना तिच्यासोबत अपशब्दांचा प्रेपग करण्यात आला, गैरस्पर्श करण्यात आला आणि सतत तिच्याकडे टक लावून पाहिले जात होते.

या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने हडफडे, मोरजी, बागा, कळंगुट, मिरामार, बागा, बोगमाळो, कोलवा, आणि आश्वे यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर ४० जलतरण क्षेत्रं तयार केली आहेत.

पर्यटन हंगामाच्या काळात जलतरणांची ही संख्या १०० पर्यंत वाढली जाण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार आता प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर तीन विभाग असतील: कुटुंबांसाठी एक, पुरुषांसाठी एक आणि केवळ महिलांसाठी एक. या क्षेत्रांना विशिष्ट सीमांकन आणि सूचना फलकांनी चिन्हांकित केलं आहे, जेणेकरून नियमांचे पालन केलं जाईल तसेच सुरक्षितता वाढवण्यासाठी या क्षेत्रांमध्ये वॉटर स्पोर्ट्सला मनाई असेल. या विशेष क्षेत्रांचा वापर करणाऱ्या महिला पर्यटकांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT