Tourist in Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या बॅगा पळविणारी टोळी गजाआड

आयआरबी, पर्यटन पोलिसांची धडक कारवाई

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या काही दिवसांपासून समुद्रकिनाऱ्यावर सामान ठेवून पाण्यात आंघोळीसाठी उतरणाऱ्या पर्यटकांचे सामान गायब करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. अशा घटनांमध्ये तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल व इतर सामान जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पर्यटकांचे समुद्रकिनाऱ्यावरून सामान चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत गेल्याने आयआरबीच्या पोलिसांना साध्या वेशात समुद्रकिनाऱ्यावर नेमण्यात आले होते. सिंकेरी, कांदोळी ते बागा बीच तसेच पेडणे किनारपट्टी भाग, अश्‍वे, हरमल या भागात असे प्रकार घडले असल्याने तेथे या पोलिसांना पर्यटन पोलिसांसोबत तैनात करण्यात आले होते. या आयआरबी पोलिसांमार्फत किनारपट्टीवर सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली. कळंगुट येथील तीन वेगवेगळ्या प्रकरणात या पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पर्यटकांच्या चोरलेल्या बॅग्स, मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत.

पर्यटक पाण्यात जाताना समुद्रकिनाऱ्यावर बॅगांमध्ये सामान ठेवतात. त्यावेळी या पर्यटकांचे लक्ष नाही याचा अंदाज घेऊन या बॅग्स पळवणाऱ्या तिघा चोरट्यांना रंगेहात धरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चोरलेले मोबाईल्स व पैशांची पाकिटे सापडली. पर्यटक व संशयितांना पोलिस स्थानकात आणून चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जप्त करण्यात आलेले मोबाईल्स पर्यटकांना परत करण्यात आले आहेत अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT