Goa Beach  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach : मोबाेर समुद्र किनाऱ्याकडील रस्‍त्‍यांवर उभारले सूचना फलक; किनाऱ्यावर वाहनांना प्रतिबंध

Goa Beach : जेणेकरून समुद्रकिनारा प्रत्‍येकासाठी सुरक्षित राहील. लोकसभा निवडणुकीमुळे या फलकांच्‍या अंमलबजावणीला उशीर झाला, परंतु निवडणूक प्रक्रिया संपल्‍यानंतर पंचायतीने आपले प्रलंबित काम पुन्‍हा सुरू केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beach :

मडगाव, सुरक्षितता वाढविण्‍यासाठी आणि स्‍थानिक समुद्र किनाऱ्याची पूर्वस्‍थिती जपण्‍यासाठी केळशी ग्रामपंचायतीने मोबोर येथील समुद्र किनाऱ्याच्‍या रस्‍त्‍यांवर सूचना फलक लावले आहेत. या उपक्रमाचा उद्देश पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर वाहन चालवण्‍यापासून रोखणे हा आहे.

असे प्रकार स्‍थानिक रहिवासी आणि पर्यटक या दोघांसाठीही चिंताजनक ठरले आहेत. केळशी पंचायतीचे सरपंच डिक्‍सन वाझ म्‍हणाले, की आम्‍ही अनेक पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांवर नियमांच्‍या विरोधात जाऊन वाहन चालवताना पाहिले आहे. नवीन फलक त्‍यांना सूचित करण्‍यासाठी आणि मार्गदर्शन करण्‍यासाठी आहेत.

जेणेकरून समुद्रकिनारा प्रत्‍येकासाठी सुरक्षित राहील. लोकसभा निवडणुकीमुळे या फलकांच्‍या अंमलबजावणीला उशीर झाला, परंतु निवडणूक प्रक्रिया संपल्‍यानंतर पंचायतीने आपले प्रलंबित काम पुन्‍हा सुरू केले आहे.

नजीक पाेहाेचणारा पावसाळ्याचा मोसम लक्षात घेऊन घरांच्‍या दुरुस्‍तीशी संबंधीत कामे आणि पावसाळ्‍याची तयारी सुरू करण्‍यात आली आहेत, असे वाझ पुढे म्‍हणाले. आम्‍ही सामाजिक जबाबदारीच्या माध्‍यमातून खरोखर गरज असलेल्‍या लोकांच्‍या घरांची दुरुस्‍ती केली आहे. पावसाळ्‍यानंतर आणखी अनेक उपक्रम हाती घेतले जातील, असे सरपंचांनी

सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंत यांच्या निवास्थानाबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त; काणकोणकर मारहाण प्रकरण तापले, राजकीय नेते हजारो नागरिक रस्त्यावर

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध; विरोधकांचे सरकारविरोधी आंदोलन, सोमवारी 'गोवा बंद'चे काँग्रेसचे आवाहन

Lashkar-e-Taiba Video: कोसळलेल्या मशीदीचे तुकडे दाखवले, 'ऑपरेशन सिंदूर'च्या कारवाईचा पुरावा आता लष्कर-ए-तोयबाने दिला

Viral Video: iPhone 17 खरेदीवरून तुफान हाणामारी! 'आधी मला, आधी मला' म्हणत ग्राहकांनी घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

Tigers In Goa: खाणींची अराजकता सुरू होण्यापूर्वी 'वाघ' देवराईत बसायचा, रक्षणकर्ता मानला जायचा; पाषाणी मूर्तीतला वाघ्रोदेव

SCROLL FOR NEXT