Airfare Of FLy91
Airfare Of FLy91 Dainik Gomantak
गोवा

Airfare Of FLy91: गोवा, सिंधुदुर्गातून फ्लाय91 ने हैद्राबाद, बेंगळुरुला जाण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील?

Pramod Yadav

Airfare Of FLy91

गोव्याची असणारी फ्लाय91 ही विमानसेवा सुरु झाली आहे. Fly91 ने मंगळवारी (दि.12) गोव्यातील मोपा आणि लक्षद्वीपमधील अगाट्टी दरम्यान पहिले उड्डाण घेतले.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथून या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. येत्या 18 मार्चपासून गोव्यातून बेंगळुरू आणि हैदराबादला जोडणारी व्यावसायिक उड्डाण सेवा सुरु करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

कंपनीने सिंधुदुर्ग आणि गोव्यातील मोपा विमानतळवरुन येत्या 18 मार्चपासून सुरु होणाऱ्या फ्लाईट्साठी बुकिंग खुले केले आहे. प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने फ्लाईट्स बुकिंग करता येणार आहे.

मोपा, गोवा ते हैद्राबाद

उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हैद्राबादला जाण्यासाठी 4,842 रुपये मोजावे लागतील. 26 मार्च रोजी उड्डाण घेणाऱ्या फ्लाईटसाठी तिकिटदर अधिक असून, या दिवशी हैद्राबाद प्रवासासाठी 8,542 रुपये मोजावे लागणार आहेत.

GOX To HYD AirFare

मोपा, गोवा ते बेंगळुरु

तसेच, बेंगळुरुसाठी मोपा विमानतळावरुन 18 मार्च रोजी 5,542 रुपये मोजावे लागतील. तर 22 आणि 23 मार्च रोजीच्या फ्लाईटसाठी 3,192 रुपये मोजावे लागतील.

GOX To BLR AirFare

सिंधुदुर्ग विमानतळ ते हैद्राबाद आणि बेंगळुरु

फ्लाय91 ने गोव्यासह नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील विमानसेवेची घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरुन 18 मार्चपासून विमाने हैद्राबाद आणि बेंगळुरुसाठी उड्डाण घेतील.

फ्लाय91च्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या विमानभाड्यानुसार, सिंधुदुर्ग विमानतळ ते हैद्राबाद आणि बेंगळुरुसाठी 2,224 रुपये मोजावे लागतील. पुढील तारखांसाठी विमानभाड्यात बदल होताना दिसत आहे.

SDW To HYD Airfare

Fly91 ने मंगळवारी गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लक्षद्वीपमधील अगाट्टी विमानतळावर लँडींग केले. अगाट्टी विमानतळावर Fly91 च्या विमानाचे स्वागत करण्यात आले, यावेळी विमानला वॉटर कॅननची सलामी देण्यात आली.

उडान योजनेअंतर्गत फ्लाय 91 ला 18 मार्ग देण्यात आले आहेत. मी त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या नागरी उड्डाणाला आता नवी गती प्राप्त होत आहे, असे सिंधिया विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT