GMC Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: ब्रेन डेड रुग्णाच्या दानाने दोघांना नवसंजीवनी

Goa Medical College: अवयव दान प्रक्रिया जीव वाचवणारी ठरत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Medical College: गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील अवयव प्रक्रिया जीव वाचवणारी ठरत आहे. ब्रेन डेड रुग्णाने दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण केल्याने चार जणांचे प्राण वाचले असल्याची घटना या आधी एकदा घडली होती. तशीच एक घटना पुन्हा एकदा घडली असून यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चांगलेच चर्चेत आहे.

‘ब्रेन डेड’ झालेल्या झारखंड येथील 40 वर्षीय व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयदानाला परवानगी दिल्याने दोन जणांचा मुत्रपिंड प्रत्यारोपण करणे शक्‍य झाले आहे.

उंचावरून पडल्याने ती व्यक्ती जबर जखमी झाली होती. तीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. डॉ. सनथ भाटकर आणि डॉ. प्रथमेश यांनी त्या रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले. यामुळे त्याचे अवयव इतरांना दान करणे शक्य झाले.

‘गोमेकॉ’त आजवर पाच वेळा अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहे. १९ जणांना त्याचा लाभ झाला आहे. ३ हृदये, ४ यकृते, २ फुफ्फुसे आदींही ‘गोमेकॉ’तून पुरवण्यात आली आहेत. सध्या ५१ जण मुत्रपिंड मिळवण्यासाठीच्या प्रतीक्षा यादीवर आहेत.

गोमेकॉतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी अवस्थेत झारखंड येथील इसमाला इस्पितळात आणण्यात आले होते. त्यामुळे केवळ मुत्रपिंडांचे प्रत्यारोपण करणे शक्य होते.

नातेवाईकांच्या परवानगीनंतर मुत्रपिंडांच्या प्रत्यारोपणासाठी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या व्यक्तींमुळे दोन जणांना यापुढे डायलिसीसवर जगावे लागणार नाही.

मुत्रपिंडांचे प्रत्यारोपण दोन रुग्णांत करण्यात आले. त्यसाठी प्रतीक्षा यादीतून मुत्रपिंड स्वीकारू शकेल, अशा इच्छुकांची निवड करण्यात आली. त्यासाठी काही वैद्यकीय निकषांचा विचार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT