Bajrang Dal Goa Dainik Gomantak
गोवा

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

Eid e Milad procession: विराज देसाई यांनी या प्रसंगी स्पष्ट केले की, धारबांदोडा व आसपासच्या भागातील नागरिकांनी आणि सहभागी संस्थांनी सावधगिरी बाळगावी.

Sameer Panditrao

धारबांदोडा: गोव्यातील कोळे, धारबांदोडा परिसरात ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित केले जाणाऱ्या जुलूसबाबत बजरंग दलाने प्रश्न उपस्थित केले आहेत. बजरंग दल गोवा विभागाचे संयोजक विराज देसाई यांनी सांगितले आहे की, जर प्रशासनाने जुलूससाठी परवानगी दिली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी आमच्यावर नसेल

विराज देसाई यांनी या प्रसंगी स्पष्ट केले की, धारबांदोडा व आसपासच्या भागातील नागरिकांनी आणि सहभागी संस्थांनी सावधगिरी बाळगावी. त्यांनी प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना संभाव्य अडचणी लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

काही कट्टर गट अशा प्रकारच्या शक्तिप्रदर्शनाकडे वळले आहेत, याआधी काणकोणात याचप्रकारची घटना घडली होती. आम्ही अशा मिरवणुकांना तीव्र विरोध करतो आणि त्या होऊ दिल्या जाणार नाहीत, याची खात्री करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की कोणताही सण आपापल्या धर्मस्थळांत अथवा आपल्या घरात साजरा करावा. अशा पद्धतीने सण केल्यास कोणीही अडवणार नाही आहे. याबाबत स्थानिक लोकांच्या मताचा आदर करावा असेही त्यांनी सांगितले.

या अशा मिरवणुकांमुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी आमच्यावर नसेल. हिंदू समाजाच्या हितासाठी आम्ही शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आवश्यक त्या उपाययोजना करू,” असेही देसाई यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT