Baina Beach Goa Dainik Gomantak
गोवा

Baina Beach Goa: आमदार आमोणकरांच्या हस्ते पर्यटन हंगामातील पहिल्या शॅकचे उद्घाटन

Baina Beach Goa: बायणा बीचवर पार पडला उद्घाटन सोहळा

Ganeshprasad Gogate

Baina Beach Goa: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बायणा बीचवर यंदाच्या पर्यटन हंगामातील पहिल्या शॅकचे उद्घाटन केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर अनेक सुविधा असणे आवश्यक आहे.

गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून बायणा समुद्रकिनारा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.

गोव्यात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून देश विदेशीचे पर्यटकही गोव्यात उतरू लागले आहेत. पर्यटकांची पसंती महागड्या हॉटेल्स, कॅसिनो, पब सोबतच बीच आणि बीचलगतच्या शॅकला आहे.

या मागणीमुळेच नवीन शॅक धोरण येण्यापूर्वी पर्यावरण विभागाने राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 364 शॅक्सची शिफारस केली होती. त्या 364 शॅक्सपैकी अंदाजे 353 शॅक्सचे वाटप करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT