Baga Beach Viral Video Prostitution Case Dainik Gomantak
गोवा

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

Baga Beach Viral Video Prostitution Case: बागा येथे विदेशी ललनेशी देहव्यापाराबाबत सौदा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागातील गुन्हे शाखेकडून गुन्हा नोंदवण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: बागा येथे विदेशी ललनेशी देहव्यापाराबाबत सौदा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस आता त्या व्हिडिओतील पर्यटकांच्या टोळक्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ते नेमके कोण आणि ती रशियन महिला कोण याविषयीची जाणून घेण्याची उत्कंठा अनेकांना लागली आहे. 'बर्च बाय रोमिओ लेन' अग्नितांडवानंतर बचावलेली विदेशी नर्तिका पर्यटक व्हिसावर येऊन क्लबमध्ये नृत्ये सादर करण्याचा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले होते.

बागा येथील व्हायरल झालेल्या व्हिडिओतील विदेशी तरुणी ही सुद्धा पर्यटक म्हणूनच गोव्यात आली होती का, याविषयी समाजमाध्यमांवर चर्चा सुरु झाली आहे. बागा किनारी भागात उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली. एका व्हायरल व्हिडिओमुळे सुरु झालेल्या या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून गुन्हे शाखेने तात्काळ हालचाल करत संबंधित टोळीचा माग काढल्याचे समोर येत आहे.

पर्यटकांची गर्दी, रात्रीची चकाकी आणि बेफिकीर वातावरण यामागे दडलेले हे काळे वास्तव उघडे पडताच स्थानिकांसह प्रशासनही सावध झाले. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला असून संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरु आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नाही, तर गोव्याच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का देणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, हा धक्कादायक प्रकार गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी पुढे आणल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेग मिळाला, त्यांच्या हस्तक्षेपामुळेच प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला, असे बोलले जात आहे.

गोव्याच्या (Goa) पर्यटनाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून 'चमकत्या दिव्या मागचा अंधार' आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणाबाबत आणखी खळबळजनक खुलासे होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत

दुसरीकडे मात्र, या प्रकरणामागे नेमके कोण आहे? ही टोळी किती मोठी आहे? आणि अजून किती ठिकाणी असे प्रकार सुरु आहेत? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. गुन्हे शाखेची पुढील कारवाई काय असेल, आणि या प्रकरणात आणखी कोणकोणते धक्कादायक खुलासे होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा

गोव्यातील किनारपट्टी भागात वेश्याव्यवसायासाठी व्यापार परवाने दिले जात असल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. एवढचं नाहीतर सरकारच्या 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' धोरणावर टीका करताना सरकारने या संकल्पनेचा अतिशय वेगळ्या आणि चिंताजनक पद्धतीने वापर केल्याचे ते म्हणाले. याशिवाय, सरदेसाई यांनी या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधत किनारपट्टी भागातील सामाजिक आणि नैतिक वातावरण धोक्यात आणले जात असल्याची चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या परवान्यांमुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेलाही तडा जाऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT