Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: अखेर बाबूश-जेनिफर न्यायालयात हजर

Goa News: पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणी संशयित महसूलमंत्री बाबूश आणि आमदार जेनिफर मोन्सेरात हे दाम्पत्य काल न्यायालयात हजर राहिले.

दैनिक गोमन्तक

Goa News: पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणी न्यायालयाकडून अंतिम समज मिळाल्यावर या प्रकरणातील संशयित महसूलमंत्री बाबूश आणि आमदार जेनिफर मोन्सेरात हे दाम्पत्य काल आल्तिनो येथील सत्र न्यायालयात हजर राहिले.

मात्र, सीबीआयने आवश्‍यक ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे ही सुनावणी तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलली. यावेळी न्यायमूर्तींनी सीबीआयच्या वकिलांनाही समज दिली आणि यानंतर कधीच या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचा इशारा दिला.

पणजी पोलिस स्थानकावरील हल्ला प्रकरण 2008 साली घडले होते. या प्रकरणी अनेक आव्हान याचिका झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन सुनावणी ठरलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी दिवाळीनंतर 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आरोपांची कागदपत्रे स्वीकारलीच पाहिजेत

या प्रकरणी 36 संशयितांवर आरोप ठेवले आहेत. बाबूश आणि जेनिफर वगळता इतर सर्व आरोपी एकदा तरी न्यायालयात हजर राहिले आहेत. प्रत्येक आरोपीने एकदा तरी न्यायालयात हजर राहून आपल्यावरील आरोपांची कागदपत्रे स्वीकारलीच पाहिजेत, असा नियम आहे. त्यामुळे कायमची सूट मागण्याचा प्रश्र्न पुढच्या सुनावणीनंतर येणार असल्याचे आरोपींचे वकील ॲड. अरुण ब्रास डिसा यांनी सांगितले.

बाबूशना मंत्रिमंडळातून वगळा: या प्रकरणी जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बाबूश यांना मंत्रिपदी ठेवू नये, अशी मागणी ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केली आहे. नि:पक्षपाती सुनावणीसाठी त्‍यांना मंत्रिमंडळातून वगळावेच लागेल. संदर्भातील एक पत्रही त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT