Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Goa Drug Case: हैदराबाद-तेलंगणा येथील अँटी-नार्कोटिक्स युनिट ‘ईगल’ दलाने मियापूर पोलिसांच्या सहकार्याने मियापूर मेट्रो स्टेशन परिसरात एका आंतरराज्य ड्रग्स तस्कराला अटक केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हैदराबाद-तेलंगणा येथील अँटी-नार्कोटिक्स युनिट ‘ईगल’ दलाने मियापूर पोलिसांच्या सहकार्याने मियापूर मेट्रो स्टेशन परिसरात एका आंतरराज्य ड्रग्स तस्कराला अटक केली आहे. त्याने गौप्यस्फोट केल्याने गोव्यातील ‘बाबा’ आणि ‘मुन्ना’ तसेच मुंबईतील ‘दानिश अन्सारी’ हे या व्यवहारात अडकल्याचे समोर आले आहे. हे तिन्ही संशयित सध्या फरार असून, तेथील पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलारेड्डी सुरेश गोपी (वय २९, मूळ रा. मिर्यालगुडा, नलगोंडा, सध्या रा. एलबी नगर, हैदराबाद) असे या संशयिताचे नाव आहे. मोबाईल डेटावरून या नेटवर्कमधील इतर ग्राहक आणि आर्थिक व्यवहारांविषयी गोपीकडून सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी गोपीकडून सुमारे ९ ग्रॅम वजनाच्या १४ एमडीएमए गोळ्या आणि दोन मोबाईल फोन जप्त केल्या आहेत. गुन्ह्यातील संशयिताचा गोव्याशी असलेला संबंध समोर आला आहे. त्यामुळे या व्यवहाराचे नेटवर्क आंतररराज्य स्तरावर पसरल्याचे सध्या स्पष्ट होत आहे.

स्थानिक ड्रग्स डिलर ‘बाबा’ कोण?

हाती आलेल्या माहितीनुसार, गोपी हा जुलै २०२४ मध्ये गोव्यात वास्तव्यास होता. त्यावेळी तो रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होता. गोव्यात असतानाच तो अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीत सक्रिय असलेल्या स्थानिक आणि आंतरराज्य नेटवर्कच्या संपर्कात आला. त्यातून त्याची ‘बाबा’ नावाच्या एका स्थानिक ड्रग्स डिलरशी ओळख झाली. ‘बाबा’कडून ड्रग्स खरेदी करून ते अधिक दराने इतरांना विकू लागला. गोव्यातील वास्तव्यादरम्यान त्याचा परिचय मुंबईतील दानिश आलम अन्सारीशी झाला. अन्सारी गोव्यात येऊन अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

गोमंतकीय ‘मुन्ना’ने विकत घेतले ड्रग्स

हैदराबादमधील काहीजणांनी एमडीएमए गोळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार संशयित गोपी याने १६ सप्टेंबर रोजी मुंबई गाठली. तेथे दानिश अन्सारी याच्याकडून प्रतिगोळी ७५० रुपये दराने एकूण २९ एमडीएमए गोळ्या खरेदी केल्या. त्यासाठी बँक ट्रान्सफरद्वारे २२,५०० रुपये पाठविले. मुंबईत असतानाच त्याने मूळ गोमंतकीय मुन्नाला १५ गोळ्या विकल्या व १४ गोळ्या घेऊन तो मुंबई येथून हैदराबादला रवाना झाला हाेता. तेथे त्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT