Rajendra Arlekar  Dainik Gomantak
गोवा

Rajendra Arlekar: 'उद्दिष्ट ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्की'; आझादी का अमृत महोत्सवमध्ये आर्लेकरांनी केले मार्गदर्शन

चैतन्य सेवा संघटनेच्या आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप

गोमन्तक डिजिटल टीम

Rajendra Arlekar उद्दिष्ट ठेऊन प्रयत्न करा यश नक्की येईल, असे उद्‍गार बिहारचे राज्‍यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काढले. चैतन्य सेवा संघटनेतर्फे आयोजित आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात आर्लेकर बोलत होते.

मडगाव येथील रवींद्र भवनच्या कृष्ण धवल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, माजी आमदार दामोदर नाईक, किसन फडते, अविनाश शिरोडकर, आदिती रेडकर, भारती होडावडकर, उत्तम रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. शिवानंद बांदेकर (डीन जी.एम.सी.), डॉ. सुधीर शेट (नावेली), आदेश कारवारकर (मडगाव), विशांत जा. गांवकर (काणकोण), राजेंद्र नाईक (कोल्हापूर) व मोहन नाईक (फातोर्डा) यांचा आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेते लहान गट प्रथम रोख रक्कम १५०० दीपनविता सामंत (सरकारी मल्टीपर्पज हायस्कूल, बोर्डा), दुसरे रोख रक्कम १००० श्रेया सोनार (पॉपुलर हायस्कूल, मडगाव), तिसरे रोख रक्कम ७०० अर्नव नाईक (रवींद्र केळेकर ज्ञान मंदिर, आके) व दहाजणांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

मोठा गट - प्रथम रोख रक्कम २००० तनिष्क खांडेपारकर (पॉपुलर हायस्कूल, मडगाव), दुसरे रोख रक्कम १५०० सुचिता कुल्लु (होली स्पिरीट हायस्कूल, मडगाव), तिसरे रोख रक्कम १००० धन्‍वी शानभोगी (पॉपुलर हायस्कूल, मडगाव) व दहाजणांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्‍यात आली.

तसेच यावेळी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या होली स्पिरीट हायस्कूलचे १०, यलोसिस हायस्कूल, बाणावलीचे ८, पॉपुलर हायस्कूलचे १०, पेरपेच्युल हायस्कूलचे २० , महिला आणि नूतन मडगावचे २०, प्रेझेन्टेशन कॉन्‍व्‍हेंट अंबाजीचे १५, फातिमा कॉन्‍व्‍हेंट मडगांवचे १०, रवींद्र केळेकर ज्ञान मंदिराचे १३ व पाँष हायस्कूल १० अशा एकूण १३० विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

बाबू कवळेकर, दामोदर नाईक, डॉ. शिवानंद बांदेकर, आदेश कारवारकर, किसन फडते व अविनाश शिरोडकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. अध्यक्षा आदिती रेडकर यांनी स्वागत केले. खजिनदार उत्तम रेडकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT