Goa: आयुष डॉक्टर्स वाढीव पगाराच्या प्रतिक्षेत Dainik Gomantak
गोवा

Goa: आयुष डॉक्टर्स वाढीव पगाराच्या प्रतिक्षेत

प्रत्येक डॉक्टरांच्या केंद्राकडुन मिळणाऱ्या पगारामध्ये जो फरक आहे ती रक्कम राज्य सरकारतर्फे देण्याची मंजुरीपण मिळाली.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत गोव्यात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना केंद्र सरकारकडुन दरमहा 20 ते 30 हजार रुपये पगार दिला जातो. 2018 पासुन सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सुचनेनुसार या सर्व डॉक्टरांना कमीत कमी दरमहा 50 हजार रुपये मिळावे म्हणुन प्रक्रियाही सुरु झाली. प्रत्येक डॉक्टरांच्या केंद्राकडुन मिळणाऱ्या पगारामध्ये जो फरक आहे ती रक्कम राज्य सरकारतर्फे देण्याची मंजुरीपण मिळाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानीही  5 मे 2021 रोजी संबंधीत फाईलवर सही करुन आपली मंजुरी दिली.

या सर्व डॉक्टरांना एप्रिल 2020 पासुन थकबाकी मिळेल असेही ठरले आहे. गोव्यातील सुमारे 110 डॉक्टरांना त्याचा फायदा होणार आहे व सरकारला त्यामुळे वर्षाकाठी 3 कोटी रुपयांचा बोजा सोसावा लागणार आहे. या सर्व प्रकारामुळे गोव्यातील आयुश डॉक्टर खूश आहेत. मात्र मुख्यमंत्र्याची फाईलवर सही होऊन तीन पेक्षा जास्त महिने उलटले तरी थकबाकी सोडाच, अजुन डॉक्टरांचा वाढीव मासिक पगार सुरु झालेला नाही.

दरम्यान आरोग्य खात्यातर्फे आरोग्य संचालनालयात ही फाईल कमीत कमी तीन ते चार वेळा तरी काही प्रश्र्न उपस्थित करुन पाठविण्यात आली व प्रत्येक वेळी संचालनालयाने समर्पक उत्तरे देऊन ती परत पाठवली आहे असे कळते. त्यामुळे ही या प्रकरणातील सरकारची चाल ढकल तर नाही ना अशी भिती काही आयुष डॉक्टरांना वाटू लागली आहे. या संबंधी आयुष डॉक्टर संघटनेच्या डॉ. स्नेहा भागवत यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यानी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी फाईलवर सही केल्याचे व त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन केल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर काय़ झाले याची माहिती नाही. कदाचीत फाईल अर्थ सचिवांच्या कचेरीत अंतिम प्रक्रियेसाठी असण्याची शक्यता वर्तवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT