Kulem Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Audit Report Controversy: ग्रामसभेत सरपंच गोविंद शिगांवकर उपस्थित ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देवू शकले नाहीत.

Manish Jadhav

कुळे: कुळे ग्रामसभेत अनेक विषयावर चर्चा होऊन गदारोळात पार पडली. 2022-23 वर्षाच्या ऑडीटमध्ये हिशोब तपासणीस योग्य असे काही कागदपत्रे मिळत नसल्याने ग्रामसभेत गरमा गरम चर्चा झाली. ग्रामसभेत सरपंच गोविंद शिगांवकर उपस्थित ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देवू शकले नाहीत. 23-24 च्या ऑडीटमध्ये सुद्धा ऑडीटरनी शेरा मारलेला असून पुढील ग्रामसभेत 23-24 चा ऑडीट रिपोर्ट ग्रामसभेत मांडू, असे सरपंच शिगांवकर यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामसभेत उपसरपंच नेहा मडकईकर, पंच अनिकेत देसाई,साईश नाईक, प्रसाद गांवकर, बेनी आजावेदो, अजय बांदेकर, सोनम दहीफोडे व आश्विनी नाईक देसाई उपस्थित होते. प्रश्न पत्रिका आदी देऊन सुद्धा ग्रामसदस्यांचे प्रश्न ग्रामसभेत घेतले जात नाहीत तर ग्रामसभा कशाली भरवायची असा सवाल यावेळी अखिल वेळीप यांनी उपस्थित केला.

मार्केट कॉम्प्लेक्स

दरम्यान, कुळे शिगाव पंचायतीची इमारत मोडून त्या जागी नवीन मार्केट कॉमप्लेक्स उभारण्यात यावे अशी मागील काही वर्षांपासून मागणी सतत ग्रामसभेत होत आलेली आहे आत्ता पुढे हे मार्केट कॉमप्लेक्स कधी होणार याविषयी ग्रामसदस्य सत्यवान खेडेकर यांनी प्रश्न विचारला. यावर आपण कायदेशीर सल्ला घेऊन त्याविषयी पुढील कृती करणार असल्याचे सरपंच गोविंद शिगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Ashok Gajapathi Raju: 17 वर्षे मंत्रिपद, 7 वेळा आमदार, एकदा खासदारकी भूषवलेले व्यक्तिमत्व; गोव्याचे 20 वे राज्यपाल अशोक गजपती राजू

POP Ganesh Idol Ban: पीओपी गणेशमूर्तींवर बंदी, पण कारवाईचे काय?

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Shravan Shanivar: श्रावण शनिवारचा दुर्मिळ योग! साडेसातीचा त्रास मिटेल; अश्वत्थ मारुतीचे व्रत कसे करावे? वाचा

SCROLL FOR NEXT