Goa : हॉटेलसाठी झाडे तोडून व टेकड्या कापून बेकायदेशीर रस्ता करण्याचा प्रयत्न  Dainik Gomanatk
गोवा

हॉटेलसाठी झाडे तोडून व टेकड्या कापून बेकायदेशीर रस्ता करण्याचा प्रयत्न

सीआरझेड किवा इतर कुठलेही परवाने न घेता बेकायदेशीरपणे सुट्टीच्या दिवसाची संधी साधून हा रस्ता एका हॉटेलच्या फायद्यासाठी केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : मोन्सेरात कुटुंबाकडून ताळगावचा विध्वस्त सुरु असून ताळगावची शेती पुरवून तेथे इमारती उभ्या केल्यानंतर आता किनाऱ्यावरील झाडे तोडून व टेकड्या कापून बेकायदेशीर रस्ता (illegal road) केला जात आहे. या प्रकरणी आपण पोलिस तक्रार करणार असून गरज भासल्यास न्यायालयातही जाणार आहे.

अशी माहिती पणजी महापालिकेचे माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक उदय मडकईकर यांनी दिली. करंझाळे येथील किनाऱ्यावर जाणाऱ्या वाटेजवळ टेकडी कापून व काही झाडे तोडून नवा रस्ता केला जात आहे. सीआरझेड किवा इतर कुठलेही परवाने न घेता बेकायदेशीरपणे सुट्टीच्या दिवसाची संधी साधून हा रस्ता एका हॉटेलच्या फायद्यासाठी केला जात आहे. मोन्सेरात कुटुंबियांतचा यात हात असून ताळगाव सरपंच व पणजीचे महापौर यात गुंतलेत असा दावा आज सदर जागी पत्रकारांना बोलावून उदय मडकईकर यांनी केला.

ताळगावच्या लोकांनी व पर्यावरण प्रेमींनी या बेकायदेशीर गोष्टींविरुध्द आता उठाव उठण्याची गरज असल्याचे मडकईकर यावेळी म्हणाले. आपण ग्रेटर पणजी पीडीएकडे या विषयावर तक्रार केली मात्र आमदार बाबूश मोन्सेरात हेच ग्रेटर पणजीचे अध्यक्ष असल्याने तेथे तक्रार करुनही फायदा झालेला नाही. करंझाळे येथे प्रभाग ४ व ५ मध्ये हा बेकायदेशीर रस्ता होत असून सर्व नियाम धाब्यावर बसवून बाबूश मोन्सेरात यांच्या सहकार्यानेच हे सर्व चालू असल्याचा आरोप ज्यो डायस यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT