Goa Asagao House Demolition Dainik Gomantak
गोवा

Goa Assgao: पूजा शर्माने लपवली पतीची ओळख

Assgao House Demolition Case: यावर्षीच्या जानेवारीपासून गोव्यात आलेच नाही; पूजा शर्मा

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर बेकायदेशीरपणे मोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या पूजा शर्मा हिने जमीन खरेदी करताना गुप्तचर विभागात असलेल्या अतुल शर्मा या आपल्या पतीची ओळख लपविली होती असे आता उघडकीस आले आहे.

या दस्तावेजासोबत जोडण्यात आलेल्या आधारकार्डाच्या प्रतीत मात्र पूजाने आपल्‍या पतीचा पत्ता - जैन मंदिराजवळ, कांदिवली-मुंबई असा नोंद केला आहे. सरकारी दराने १८ लाख रुपये मूल्य होणारी आसगावातील जमीन १ कोटी १४ लाख रुपयांना विकत घेण्यात आली आहे. त्‍यासाठी ६ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही अदा करण्यात आलेय.

केवळ गृहिणी असलेली व्यक्ती एवढा मोठा व्यवहार कसा करते, याचा संशय सरकारी यंत्रणांना आला नाही याचेही आश्चर्यच वाटते. ख्रिस पिंटो व इमर्जसियाना पिंटो या दाम्‍पत्याने सदर विक्रीखत म्हापसा उपनिबंधक कार्यालयात दाखल केले आहे. ‘मानचो वल्लो’ किंवा ‘आल्ता’ नावाने ही मालमत्ता स्थानिक पातळीवर ओळखली जाते.

या जमिनीत १२०/१ क्रमांकाची इमारत असल्याचे विक्रीखतात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मालमत्तेच्या उत्तरेला अंतर्गत रस्ता, दक्षिणेला नाला, पूर्वेला सार्वजनिक रस्ता तर पश्चिमेला भूखंड आहे. जमिनीचा व्यवहार बॅंकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

१९ लाख ४० हजार रुपये दोन वेळा वळते करण्यात आले तर ३७ लाखांचे दोन धनादेश पुढील तारखेच्‍या व्यवहाराची नोंदणी करताना देण्यात आले होते. शिवाय ३ लाख ६० हजार रुपये नोंदणी शुल्क, तत्काळ भेटीसाठी १ हजार रुपये शुल्क, म्युटेशन शुल्क १ हजार ५०० व प्रक्रिया शुल्क १ हजार ३८० रुपये अदा करण्यात आले आहेत. त्यातही तत्काळ भेटीसाठी १ हजार रुपये शुल्क असताना ५ हजार रुपये अदा करण्यात आले.

क्राईम ब्रँचच्या एसआयटीने आसगाव घर मोडण्याच्या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये पूजा शर्मा हिचाही समावेश केला आहे. हणजूण पोलिसांनी सुरूवातीला समन्स पाठविले. त्यानंतर हा तपास क्राईम ब्रँचकडे आल्यानंतर त्यांनी १ जुलैला उपस्थित राहण्याचे समन्स बजावले. त्यावेळी मी अमृतसर व हिमाचल प्रदेश येथे होती.

एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही समन्सची तारीख जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निश्‍चित करण्याची विनंती केली होती. मात्र एसआयटीने सर्व कामे बाजूला ठेवून त्या दिवशी उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळे मला अटक होण्याची शक्यता असल्याने हा अर्ज दाखल केला, असे पूजाने सांगितले.

आसगाव येथील ६०० चौ. मी. जमीन ख्रिस पिंटो व त्यांची पत्नी यांच्याकडून ५ सप्टेंबर २०२३ रोजी विक्रीखत करून घेतले आहे. त्याचे म्युटेशनही झालेले आहे. मी कायदा पदव्युत्तर आहे, त्यामुळे कायदा हातात न घेण्याबाबतचे ज्ञान आहे. मला दोन लहान मुली आहेत व त्या माझ्यावर अवलंबून आहेत. दिलेल्या दिवशी चौकशीला उपस्थित राहून अटक झाल्यास मुलींपासून दूर होईल, अशी बाजू पूजा शर्मा हिने मांडली आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८ जणांपैकी जेसीबी ऑपरेटरची यापूर्वीच जामिनावर सुटका झाली आहे. अटकेतील ७ जणांपैकी अर्शद ख्वाजा, तीन महिला बाऊन्‍सर्सना जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निर्णय उद्यापर्यंत राखीव ठेवला आहे.

म्‍युटेशन अर्जात नाही आवश्‍‍यक माहिती

म्युटेशनसाठी केलेल्या अर्जात अर्जदाराच्या संपर्काचा तपशील, ईमेल व मोबाईल क्रमांक या रकान्यांमध्‍ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उलट विक्रीखतात पूजा शर्मा यांचा आधारकार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक नोंदविण्यात आला आहे. दरम्‍यान, हा ६०० चौरस मीटरचा भूखंड प्रादेशिक आराखडा २०२१ नुसार वस्तीसाठी म्हणून वर्गीकृत केला आहे. ग्राम २ वर्गातील या भूखंडासाठी ६० चटई क्षेत्र देण्यातआले आहे.

जामिनावर आज निकाल!

या प्रकरणी अटक केलेला अर्शद ख्वाजा, अश्पाक शेख तसेच तीन महिला बाऊन्‍सर्स मिळून पाचजणांच्या जामिनावर आज सोमवारी अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. उद्या मंगळवारी यावर निर्णय येऊ शकतो.

जमिनीचे मालक असे गेले बदलत

सदर जमिनीची मालकीही बदलत गेली आहे. या जमिनीचे मूळ मालक जुआंव फ्रान्‍सिस पावलू फिलिप डिसोझा व मारिया सांतान डिसोझा होते. त्यांनी या मोठ्या मालमत्तेचा काही हिस्सा १९६८ मध्‍ये वेगळा काढला. १९७७ मध्ये त्यांनी ही जमीन त्यांची एकुलती एक मुलगी ॲमी मारिया यांना भेट दिली. साहजिकच ॲमी मारिया वाझ व तिचा पती फेड्रिक ज्युलियाल कायतान वाझ हे या जमिनीचे मालक बनले.

त्यांनी या जमिनीतून ६०० चौरस मीटरचा भूखंड वेगळा काढला. त्यांच्याकडून तो ख्रिस पिंटो व इमर्जसियाना पिंटो यांनी तो भूखंड विकत घेतला. २००० मध्ये त्यांनी १७६ चौरस मीटर जमिनीत बांधकाम केले. आता जमीनविक्री करताना जमिनीचे मूल्य ९६ लाख रुपये तर इमारतीचे मूल्य १८ लाख रुपये आहे. मुद्रांक शुल्क व इतर करापोटी हा व्यवहार १ कोटी २० लाख रुपयांचा दाखवण्यात आला आहे. प्राप्तिकर खात्याला व्यवहारावरील १ टक्का कर अदाही करण्यात आला आहे.

घटनेवेळी मी गोव्यात नव्हते

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर मोडण्याच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. यावर्षीच्या जानेवारीपासून गोव्यात आलेच नाही. ही जागा खाली करून देण्याची हमी जमीनमालकाने दिली होती. घटना घडली तेव्हा गोव्यात नव्हते. त्यामुळे पोलिसांनी माझ्‍याविरोधात दाखल केलेला गुन्हा खोटा आहे, असा दावा पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या सहा पानी अर्जात केला आहे. या अर्जावरील सुनावणीवेळी सत्र न्यायालयाने एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तपासकाम डायरी घेऊन ३ जुलैला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमींमध्ये उत्साह, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT