winter session goa assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: 5 दिवसांचे हिवाळी अधिवेशन, 25 बळींचा हिशोब; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचा मास्टरप्लॅन काय?

Goa Assembly Winter Session: गोव्याच्या विधानसभेचे आगामी हिवाळी अधिवेशन १२ जानेवारीपासून सुरू होत असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कंबर कसली आहे

Akshata Chhatre

goa assembly winter session date: गोव्याच्या विधानसभेचे आगामी हिवाळी अधिवेशन १२ जानेवारीपासून सुरू होत असून या पाच दिवसांच्या अधिवेशनात भाजप सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांच्यासोबतचे संबंध काहीसे ताणलेले असतानाही, आलेमाव यांनी ३ जानेवारी रोजी सर्व विरोधी आमदारांची एक संयुक्त बैठक बोलावलीये. या बैठकीत सरकारविरोधात एक सामायिक रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राजकीय मतभेद आणि एकजुटीचे आव्हान

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, आप आणि आरजीपी या तिन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. या राजकीय संघर्षामुळे विरोधकांमधील दरी वाढल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वीच्या पावसाळी अधिवेशनावेळीही गोवा फॉरवर्डचे विजई सरदेसाई आणि आरजीपीचे वीरेश बोरकर यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले होते. अशा पार्श्वभूमीवर, ३ जानेवारीला होणाऱ्या बैठकीला हे पक्ष उपस्थित राहणार का, हा मोठा प्रश्न आहे. युरी आलेमाव यांनी मात्र आशा व्यक्त केली की, गोव्याच्या हितासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व विरोधक एका छताखाली येतील.

हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि खासगी कामकाज

विधानसभेचे हे हिवाळी अधिवेशन १२ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरू होईल. राज्यपाल आपल्या भाषणातून सरकारचे आगामी धोरण आणि प्राधान्यक्रम स्पष्ट करतील. विशेष म्हणजे, १६ जानेवारी हा दिवस 'खासगी सदस्यांचा दिवस' म्हणून राखून ठेवण्यात आला आहे.

या दिवशी आमदार आपल्या मतदारसंघातील आणि राज्याशी संबंधित महत्त्वाचे ठराव आणि विधेयके मांडू शकतील. या पाच दिवसांच्या कालावधीत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधकांकडे मर्यादित वेळ असल्याने एकजूट असणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल.

'रोमिओ लेन' अग्नितांडवाचा मुद्दा गाजणार

या अधिवेशनात सर्वात चर्चेचा आणि संवेदनशील मुद्दा ठरेल तो म्हणजे 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबमध्ये लागलेली भीषण आग. या दुर्घटनेत २५ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, ज्यामुळे संपूर्ण गोव्यात संतापाची लाट आहे.

नाईट क्लबमधील अवैध बांधकामे, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेतील तपासाची प्रगती आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई यावर विरोधक जाब विचारणार आहेत.

अवैध पर्यटन आस्थापनांवरून सरकारला घेरण्याची शक्यता

नाईट क्लब दुर्घटनेनंतर सरकारने राज्यभरातील अवैध पर्यटन आस्थापनांवर जी कारवाई सुरू केली, त्यावरूनही वाद होण्याची चिन्हे आहेत. ही कारवाई केवळ दिखावा आहे की खरोखर नियमांची अंमलबजावणी होतेय, यावर विरोधक प्रश्न उपस्थित करणार आहेत. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था आणि वाढती गुन्हेगारी यावरही गदारोळ होण्याची शक्यता असून एकूणच, १२ जानेवारीपासून सुरू होणारे हे अधिवेशन वादळी ठरण्याचे सर्व संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सोनं, रोकड अन् महागडे गॅजेट्स... पेडण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 53 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

गोवा सरकारकडून भारतरत्न वाजपेयींना अनोखी श्रद्धांजली; नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे नामकरण केले 'अटल'

पाकिस्तान लष्करप्रमुख आसीम मुनीरनं गुपचूप उरकलं लेकीचं लग्न, पुतण्यालाचं बनवलं जावई; रावळपिंडीत पार पडला शाही सोहळा!

Viral Video: बंदुकीचा धाक दाखवून लुटायला आले, पण 'एका' धाडसी कृत्याने उलटला खेळ, भरचौकात उतरवला माज; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 'धूम' स्टाईल दरोड्याचा प्रयत्न! गोव्याला जाणाऱ्या 'कुरिअर कंटेनर'चा पाठलाग अन् दगडफेक, 6 जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT