Yuri Alemao, Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Winter Session 2026: गोव्याची हवा विषारी झाली! पणजी, पर्वरीसह प्रमुख शहरांत प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; हवेच्या गुणवत्तेवरुन युरींचा सरकारला जाब

Yuri Alemao On Goa Air Quality Index: निसर्गरम्य आणि स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या हवेची गुणवत्ता आता खालावू लागली आहे.

Manish Jadhav

पणजी: निसर्गरम्य आणि स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या हवेची गुणवत्ता आता खालावू लागली आहे. गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 'शून्य प्रहरात' (Zero Hour) विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील वाढत्या वायू प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. जानेवारी 2026 च्या पहिल्याच आठवड्यात गोव्यातील प्रमुख शहरांचा 'एअर क्वालिटी इंडेक्स' अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे समोर आल्याने सभागृहात मोठी चर्चा रंगली.

युरी आलेमाव यांचा प्रदूषणाचा 'रिपोर्ट कार्ड'

आलेमाव यांनी अधिकृत आकडेवारीचा दाखला देत सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, "जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात पणजी, पर्वरी, मुरगाव आणि बांबोळी यांसारख्या शहरांमधील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 163 ते 178 च्या दरम्यान नोंदवला गेला आहे. हा स्तर मानवी आरोग्यासाठी 'अस्वस्थ' (Unhealthy) करणारा मानला जातो. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर गोमंतकीयांना श्वसनाचे गंभीर आजार जडू शकतात."

वाढत्या प्रदूषणामागे अनिर्बंध शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरु असलेली प्रचंड बांधकामे कारणीभूत असल्याचा आरोपही आलेमाव यांनी यावेळी केला. "गोव्याची ओळख ही केवळ पर्यटनापुरती मर्यादित नसून ती येथील शुद्ध हवेसाठीही आहे, मात्र आज ती ओळख धोक्यात आली आहे," असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांचे सविस्तर उत्तर

युरी आलेमाव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार या विषयावर गंभीर असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्यातील हवेच्या गुणवत्तेचे (AQI) सरकारकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) आणि पर्यावरण विभाग या दोन्ही यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहेत."

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, ज्या भागांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे, तिथे प्रदूषण (Pollution) नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. बांधकामाच्या ठिकाणी धुळीवर नियंत्रण मिळवणे आणि जुन्या वाहनांच्या उत्सर्जनावर लक्ष ठेवणे यांसारख्या तांत्रिक बाबींवर पर्यावरण विभाग काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार

तज्ज्ञांच्या मते, 160 पेक्षा जास्त AQI असणे म्हणजे हवेत सूक्ष्म कणांचे (PM 2.5) प्रमाण वाढणे होय. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि दम्यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा त्रास होऊ शकतो. निसर्गप्रेमी गोमंतकीयांसाठी ही आकडेवारी धोक्याची घंटा मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल'ला न्यायालयाचा मोठा दणका! पंचायत सचिवांनी दिलेला बांधकाम परवाना रद्द

IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीचा राजकोटमध्ये धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड; न्यूझीलंडविरुद्ध बनला भारताचा 'रनमशीन' VIDEO

Goa Assembly Live: पर्रा परिसरात चोरांचा धुमाकूळ

Goa Assembly Session: मंत्रिमंडळ निर्णयांच्या गोपनीयतेवरून विधानसभेत रणकंदन; 16 जानेवारीला चर्चेची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Crime News: प्रेम, धोका अन् टोकाचं पाऊल! 21 वर्षीय एअर होस्टेसनं संपवलं जीवन; लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT