Goa Governor P. S. Sreedharan Pillai’s Addressing Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Governor Address: गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात, 2027-28 पर्यंत सर्व इयत्तांसाठी NEP; राज्यपाल्यांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

Goa Assembly winter session 2025: राज्यात १६६ योजनांचा लाभ थेट लाभधारकांना मिळतोय, यात ६१ केंद्रीय आणि १०५ राज्य पातळीवरील योजना आहेत.

Pramod Yadav

Goa Assembly winter session 2025 Governor Address

पर्वरी: गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनास गुरुवारपासून सुरुवात झाली. अधिवेशाची सुरुवात राज्यपाल पी. एस. श्रीधन पिल्लई यांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपालांनी त्यांच्या भाषणात गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे सांगत राज्यात २०२७-२८ पर्यंत सर्व वर्गांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याचे सांगितले. जाणून घेऊयात राज्यपालांच्या अभिभाषणातील काही महत्वाचे मुद्दे.

राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

- नागरिकांच्या तक्रारीचे निवारण वेळेत व्हावे यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन सुरु करण्यात आलीय. (९३१९८२८५८१) सध्या सात विभागांसाठी सेवा सुरु करण्यात आली आहे.

- सरकारने कदंबचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्मार्ट ट्रान्झिट कार्ड सुरु केले. यात म्हजी बस सेवेचा देखील समावेश आहे.

- E-DAR Electronic Detailed Accident Report, रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत E-DAR प्रकल्पाची सुरुवात यात ब्लॅक स्पॉट शोधून अपघात पीडितांना तात्काळ मदत पुरवण्याचा योजना. अपघात पीडितांना २०२४-२५ वर्षात ९४.६० लाखांची मदत वितरीत.

- राज्यात १६६ योजनांचा लाभ थेट लाभधारकांना मिळतोय, यात ६१ केंद्रीय आणि १०५ राज्य पातळीवरील योजना आहेत.

- राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असून, गुन्हे तपासाचे प्रमाण ८८.३८ टक्के एवढे आहे.

- वाहतूक खात्याने ४ लाख ९१ हजार ७९६ जणांवर वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी कारवाई करत २९. २८ कोटी दंड केला वसूल.

- केपे, फातोर्डा, मायणा कुडतरी येथे नवे पोलिस स्थानक तसेच, आयआयटी गोवा आणि बिट्स पिलानी सोबत कायदा आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी करार

- महिलांसाठी हेल्पलाईन १०९१ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध तर व्हॉट्सअपसाठी ७८७५७५६१७७ संपर्क क्रमांक उपलब्ध आहे. पिंक फोर्सची सेवा.

- पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार, रॅपीड मॉलिक्युलर टेस्ट पुरवणारे गोवा पहिले राज्य. उसगाव आणि शिरोडा पंचायत टीबी मुक्त घोषित.

-०९ डिसेंबर २०२४ पर्यंत गोव्यात आठ लाख ७१ हजार ०८६ एवढे आभा कार्ड तयार.

- संजय अनंत पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबदद्ल अभिनंदन.

- सरकार जैविक शेतीला प्रोत्साहन देत आहे. राज्यात २,४६० शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वितरण.

- मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट कनेक्टिव्हिटी पुरवणाऱ्या मोपा लिंक रोडसाठी ११८३.१६ कोटी खर्च.

- देशातील पहिल्या केबल स्टे ब्रिज दक्षिण गोव्यात उभारण्यात आला.

- पाणी संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत १०० बंधारे उभारण्याची योजना या अंतर्गत नोव्हेंबर २०२४ पर्यंत ७५ बंधाऱ्याचे काम पूर्ण

- पारदर्शक नोकरभरतीसाठी कर्मचारी भरती आयोगाची स्थापना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT