Goa assembly monsoon session 2023 | Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: 'अबकारी'तील गैरकारभाराप्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल; कर वसूली आकडेवारीची सरकारकडून लपवाछपवी

विरोधकांचा हल्लाबोल ः मद्य व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session राज्यातील अबकारी खात्यातील गैरकारभारावर महानियंत्रक व महालेखापालाने (कॅग) ठपका ठेवल्यावर त्या आधारे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

विरोधकांनी विविध आकडेवारी, उदाहरणे दिली तरी शेवटपर्यंत सरकारकडून याप्रकरणी नेमकी काय कारवाई करण्यात आली किंवा चुकवलेल्या करापैकी किती कर वसूल केला याविषयी नेमकी आकडेवारी देण्यात आली नाही.

याउलट हा व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती जाण्यास गोमंतकीय परवानाधारकच जबाबदार आहेत, असा ठपका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठेवला.

प्रश्नोत्तर तासाला या विषयावर अनेकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अंतर्गत लेखापरीक्षण करून घेतले आहे. कर चुकवेगिरी टाळण्यासाठी परिपत्रके जारी केली आहेत असे सांगून वेळ मारून नेली.

त्यामुळे अखेरीस अल्पसंख्याक व बहुजन समाजाच्या हातातील हा व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती गेल्यास सरकारला त्यांचे शाप भोगावे लागतील हा आमदार विजय सरदेसाई यांचा इशारा सरकारला ऐकावा लागला.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर किरकोळ मद्यविक्रीस परवाना दिला जाणार आहे. देशात व विदेशात सर्वच विमानतळावर अशी विक्री चालते असा युक्तिवाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज प्रश्नोत्तर तासाला केला.

विमानतळावर असा परवाना दिल्यास येणारे विमानतळावरून मद्य घेऊन येतील आणि जाणारे विमानतळावरच मद्य खरेदी करतील.

यामुळे आजवर अल्पसंख्याक व बहुजनांच्या हाती असलेला किरकोळ मद्यविक्रीचा व्यवसाय संपून जाईल अशी भीती आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्नोत्तर तासाला व्यक्त केली होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात कोणत्या प्रकारच्या मद्याची किती विक्री होते याची नेमकी आकडेवारी सरकारकडे नसल्याचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, यापूर्वी प्रश्न विचारला असता माहिती खूप असल्याने देता येत नसल्याचे कारण दिले.

आता दीड वर्षाची आकडेवारी विचारली तरी तेच कारण दिले जाते. कोणत्या प्रकारच्या मद्याची किती विक्री होते याची सरकारकडे माहिती नसेल तर किरकोळ दरावर सरकारचे नियंत्रण नाही, हे सिद्ध होते.

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशी आकडेवारी काढण्यास खात्याचे सर्व कर्मचारी गुंतले तरी सहा महिने लागतील, असे नमूद केले.

आमदार विजय सरदेसाई यांनी कर बुडवेगिरी करण्यास पूरक वातावरण ठेवणे हा घोटाळा असल्याचे नमूद केले. सरकारने चुकवलेल्या करापैकी किती वसुली केली ते नेमकेपणाने सांगावे अशी मागणी त्यांनी लावून धरली.

मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेमकी आकडेवारी दिली नाही. त्यांनी केवळ पाच कसिनोचालकांनी चुकवलेल्या करावरील व्याजाविषयी हरकत उपस्थित केली आहे, मात्र वसुली केली जाईल असे नमूद केले.

अबकारी खात्याच्या कारभाराचा पंचनामा

अबकारी कर कमी म्हणून स्वस्त मद्य अशी गोव्याची ओळख असली तरी त्या व्यवसायावर सरकारचे म्हणावे तसे नियंत्रण नसल्याचे विधानसभेत आज उघड झाले. महानियंत्रक व महालेखापाल (सीएजी) अहवालाच्या आधारे विरोधी आमदारांनी अबकारी खात्याच्या कारभाराचा जोरदार पंचनामा प्रश्नोत्तर तासावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT