गोवा विद्यापीठ मार्गावरील वाहतूक समस्या; ABVP शिष्टमंडळाच्या कदंबा व्यवस्थापकीय संचालकांकडे विविध मागण्या

विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था पुरवण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी संचालकांना देण्यात आले.
ABVP Kadamba
ABVP Kadamba
Published on
Updated on

गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवर अभाविपच्या शिष्टमंडळाने कदंबाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा केली. अभाविपच्या गोवा विद्यापीठ कॅम्पस युनिटच्या शिष्टमंडळाने कदंबा महामंडळ (KTCL) च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सोमवारी बैठक घेतली. विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था पुरवण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी संचालकांना देण्यात आले.

बैठकीदरम्यान, अभाविप गोवा विद्यापीठ कॅम्पस युनिटच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना विद्यापीठात ये-जा करताना येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली. पणजी आणि गोवा युनिव्हर्सिटी कॅम्पस दरम्यान वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहा अतिरिक्त मार्ग तयार करण्याची मागणी केली.

अभाविपने केलेल्या मागण्या

- मुख्य मार्ग (पणजी - गोवा विद्यापीठ): विद्यापीठ कॅम्पसमध्ये सकाळी 9:15 वाजता पोहोचण्यासाठी तीन बसेस, दुपारी 1:50 वाजता कॅम्पसमधून निघणाऱ्या तीन बसेस आणि तीन बसेस यांचा समावेश असलेले सर्वसमावेशक वेळापत्रक तयार करण्याची सूचना केली.

- संध्याकाळी 5:10 वाजता निघेल अशी एक बस. याव्यतिरिक्त, कॅम्पसमध्ये तीन समर्पित बस नेहमी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली

ABVP Kadamba
गोवा वाहतूक खाते मालामाल; नव्या वाहतूक कायद्यानंतर दंड वसुलीत सरासरी 200 टक्के वाढ

- गोव्यातील विविध परिसरांना जोडणारे सहा अतिरिक्त मार्ग निर्माण करण्याची मागणी. प्रत्येक मार्गावर दोन बसेस सकाळी 9:15 वाजता कॅम्पसमध्ये पोहोचतील आणि दोन बसेस संध्याकाळी 5:10 वाजता कॅम्पस मधून सुटतील, ज्यामुळे विविध भागांतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण होतील.

-प्रस्तावित वेळापत्रकाच्या आधारे, वाढीव मागणी प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी एकूण 15 बसेस आवश्यक आहेत, असे अभाविपने म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या वाहतूक समस्येबाबत सोमवारी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर माविन गुदिन्हो यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kadamba Bus Drivers Recruitment
Goa University
Goa Rent a Cab Business
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com