'प्रत्येक गोंयकाराला अभिमान वाटेल', गोव्यातील 400 वर्षे जुन्या दगडी पूलाचे होणार पुनरुज्जीवन

गोव्यात घोडागाडीच्या वाहतुकीसाठी बांधलेला सुमारे 400 वर्षे जुन्या दगडी पूलाचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
Ponte de Linhares stone bridge
Ponte de Linhares stone bridgeTwitter
Published on
Updated on

गोव्यात घोडागाडीच्या वाहतुकीसाठी बांधलेला सुमारे 400 वर्षे जुन्या दगडी पूलाचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी दिली आहे. पणजी आणि रायबंदरला जोडणारा पोंटे डी लिनहारेस (Ponte de Linhares stone bridge ) हा पूल 1633-34 मध्ये बांधण्यात आला होता.

पोंटे डी लिनहारेस या पूलाचे 1634 मध्ये बांधकाम पूर्ण झाले तेव्हा तो त्यावेळी जगातील सर्वात लांब 3.2 किमी लांबी असलेला एकमेव पूल होता असे म्हटले जाते. प्रत्येक गोंयकाराला अभिमान वाटेल असे या पुलाचे काम केले जाईल अशी ग्वाही काब्राल यांनी दिली.

काब्राल यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, 1980 च्या दशकात पुलावर मातीची धूप होत असल्याने धूप रोखण्यासाठी नदीच्या दक्षिणेकडील भागात खारफुटीची झाडे लावण्याचे काम वनविभागाने हाती घेतले होते.

2011 आणि 2014 मध्ये सतत भरती-ओहोटीमुळे पुलाचे नुकसान झाले होते. त्याचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून गोवा सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) संरक्षक भिंत बांधण्यास सुरुवात केली होती, असेही मंत्री काब्राल म्हणाले.

पुलाचे नुकसान टाळण्यासाठी, PWD ने अवजड वाहनांची वाहतूक पणजी ते ओल्ड गोव्याकडे वळवली, असे काब्राल म्हणाले.

Ponte de Linhares stone bridge
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 12: मद्य व्यवसाय, मोपा, म्हादई आणि पाणी; सभागृहातील दिवसभराचा सविस्तर रिपोर्ट

“मी माझ्या विभागाला या पुलाचा संरचनात्मक आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुलाबद्दल शंका असल्यास, पूल वाहनांसाठी तसेच स्थानिक बससाठी बंद केला जाईल. ऐतिहासिक पूल असल्याने, पुनरुज्जीवन करताना कोणती पद्धत अवलंबली जावी याच्या निर्णयासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये, कॉजवेचा अर्धा मीटर भाग बुडाला होता ज्याची नंतर दुरुस्ती करण्यात आली. तर, ऑगस्ट 2022 मध्ये, कॉजवेची एक लेन कमानीखाली पायथ्याला गंजल्यामुळे बंद करण्यात आली.

पुलावर अवजड वाहनांना बंदी घातली असून वेगमर्यादाही लागू केली आहे. पूल हलक्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी सुरू आहे. असे काब्राल म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com