Goa Assembly Monsoon Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session : स्मार्ट सिटी घोटाळ्याचे पाप कोणाचे? विरोधक आक्रमक

घोटाळ्याचे पाप कोणाचे? : पुढील वर्षी पूरस्थिती टाळणार : बाबूशने व्यक्त केली दिलगिरी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीतील स्मार्ट सिटीचे काम आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवरून विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत या कामाची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती नेमण्याची विरोधकांनी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

तथापि, पणजीत निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबू मोन्सेरात यांनी ‘पणजीतील लोकांचे मला वाईट वाटते’ असे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

विरोधी आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा आणि वीरेश बोरकर यांनी ‘पावसाळ्यात वारंवार पणजीत पाणी साचते’ या विषयावर लक्षवेधी मांडली.

त्यावर मोन्सेरात यांनी सांगितले की, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या स्वयंदिप्तपाल चौधरी यांनी सुरुवातीला सुशोभीकरणाच्या कामांवर भर दिला.

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, राजधानी पणजी हे स्मार्ट सिटीचे मॉडेल होईल, असे वाटत होते; पण तसे झालेच नाही. एकाच संस्थेमार्फत ही कामे होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, मुख्यमंत्री ‘भिवपाची गरज ना’ म्हणून सांगतात; पण पणजीत पाणी साचतेच, त्याचे काय? प्रशासन पूर्णपणे ढासळलेले आहे.

भ्रष्टाचाराचे हे एक उदाहरण आहे. विजय सरदेसाई म्हणाले, पणजीत मुख्यमंत्री भेट देतात आणि पूर येणार नाही म्हणून सांगतात. तिसऱ्याच दिवशी साबांखा मंत्री नीलेश काब्राल हे पूर येणार नाही, असे म्हणता येणार नाही. मळ्यात पंपिंग स्टेशन उभारले म्हणून मध्य पणजीत पाणी साचणार नाही, असे नाही, असे सांगतात, याला काय म्हणावे?

...ही तर पणजीवासीयांची चेष्टा : उत्पल पर्रीकर

मोन्सेरात यांचे राजकीय विरोधक उत्पल पर्रीकर यांनी ट्वीट करत स्मार्ट सिटी विषयावर टीका करण्याची संधी सोडली नाही. मोन्सेरात यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे पणजीवासीयांची क्रूर चेष्टा आहे, असे उत्पल म्हणाले.

यापूर्वी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवरून उत्पल हे सतत स्थानिक नेतृत्वावर टीका करत होते. त्यातच आता विधानसभेत मोन्सेरात यांनी पणजीवासीयांविषयी व्यक्त केलेल्या मताची उत्पल यांनी खिल्ली उडवली आहे.

सल्लागार हवेतच कशाला?

या कामासाठी सल्लागार नेमले आहेत, त्यांची खरोखरच सरकारला गरज होती काय? त्यासाठी जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम खात्यात जाणकार आहेत, त्यांची मदत घ्यायला हवी होती. पणजीच्या भविष्याचा विचार करून स्मार्ट सिटीचे काम पुढे नेऊ.

पुढील वर्षी पाणी साचण्याचे प्रकार घडणार नाहीत, याकडेही लक्ष पुरविले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी सभागृहात दिले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणी कमी प्रमाणात आणि काही वेळ साचले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मळ्यात पंपिंग स्टेशन झाल्यामुळे पाणी साचण्याचा प्रकार घडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT