Goa Assembly session  Dainik Gomantak
गोवा

विधानसभा अधिवेशन किती कार्यक्षम?

‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात प्रकाश कामत आणि एल्विस गोम्स यांचा सवाल

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा होत नाही. विरोधक सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक होत नसतील तर अधिवेशन कार्यक्षम आहे का अशी शंका येते, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत आणि माजी सनदी अधिकारी तथा काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी व्‍यक्‍त केले. ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी ‘अधिवेशन किती कार्यक्षम’ या विषयावर मान्यवरांशी चर्चा केली.

प्रकाश कामत म्हणाले, पत्रकार या नात्याने मी गेली 30 ते 35 वर्षे अधिवेशनाचे वार्तांकन केले आहे. लोकांचे प्रश्न आणि समस्या सभागृहात मांडणे विरोधकांचे प्रमुख काम आहे. पूर्वी विरोधक सरकारला सळो की पळो करून सोडत होते. सध्या तसे काही दिसत नाही. रमाकांत खलप, काशिनाथ जल्‍मी यांच्‍यासारखे विरोधी नेते सरकारला विविध प्रश्‍नांवरून हैराण करून सोडत होते. अधिवेशनाच्‍या माध्यमातून आपण केलेली कामे लोकांसमोर मांडण्याची सरकारला संधी असते. तसेच लोकहिताची कामे, निर्णय आदींची माहिती देण्याचे उत्तम व्‍यासपीठ असते. पण सध्या उलटेच घडत आहे. विरोधक थंडावले आहेत, तर सत्ताधाऱ्यांची अधिवेशन गुंडाळण्याची गडबड सुरू आहे.

पूर्वी काशिनाथ जल्मी, रमाकांत खलप, मनोहर पर्रीकर यांच्यासारखे विरोधक सरकारला जेरीस आणत. पण आता सगळे काही साटेलोटे असल्यासारखे दिसत आहे. या सभागृहात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. ही संख्या काही कमी नाही. सरकारला घेरण्यासाठी इतके लोक पुरे आहेत. पण आता तसे चित्र दिसत नाही, असे गोम्स म्हणाले. लोकांची अपेक्षा समजू शकतो पण निवडून आलेल्‍या लोकप्रतिनिधींनी सत्तेत असो वा नसो लोकांसाठी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी ठेवायला हवी, असे कामत म्‍हणाले.

...तरीही कामे करणे शक्य येतात

आता प्रत्येकाला सत्तेची लालसा का, असा सवाल राजू नायक यांनी केला असता कामत म्हणाले, आजकाल लोकांना आपला आमदार सत्तेत असेल तरच कामे होतील असे वाटू लागले आहे. अर्थात धमक असेल तर विरोधात राहूनही कामे करता येतात.

विरोधकांचे मौन घातक

एल्विस गोम्स म्हणाले, सभागृहात सध्या विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण, हेच कळेनासे झाले आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील सीमारेषा धूसर झाली आहे. पूर्वी विधानसभेचे अधिवेशन एक ते दीड महिना चालायचे. आता विरोधक सभागृहात काही बोलत नाहीत आणि सरकारलाही अधिवेशन नको आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT