Vijai Sardesai, Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विरोधकांच्‍या बैठकीला विजय सरदेसाई, वीरेश गैरहजर! ‘आप’च्‍या दोन्‍ही आमदारांची उपस्‍थिती

Goa Assembly Session: विधानसभा अधिवेशनाची अधिसूचना जारी होताच प्रथेनुसार विरोधी पक्षनेते विरोधी आमदारांची बैठक घेऊन प्रश्‍न, खासगी ठराव याबाबत त्‍यांच्‍याशी चर्चा करून रणनीती आखली जाते.

Sameer Panditrao

पणजी: येत्‍या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या गोवा राज्‍य विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलावलेल्‍या बैठकीला आम आदमी पक्षाचे (आप) आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस आणि क्रुझ सिल्‍वा यांनी उपस्‍थिती लावली. पण, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र पाठ फिरवली.

विधानसभा अधिवेशनाची अधिसूचना जारी होताच प्रथेनुसार विरोधी पक्षनेते विरोधी आमदारांची बैठक घेऊन प्रश्‍न, खासगी ठराव याबाबत त्‍यांच्‍याशी चर्चा करून रणनीती आखली जाते. यावेळी मात्र विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रश्‍न आणि खासगी ठराव सादर करण्‍याचा कालावधी संपल्‍यानंतर विरोधी आमदारांच्‍या बैठकीचे आयोजन केले.

त्‍यावरून आमदार विजय सरदेसाई यांनी त्‍यांच्‍यावर टीकास्त्र सोडले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्‍यामुळे विरोधी पक्षनेत्‍यांनी बोलावलेल्‍या बैठकीला आता अर्थ राहत नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते. तर, ‘आप’चे राज्‍य समन्‍वयक अमित पालेकर यांनीही याबाबत नाराजी व्‍यक्त केली होती.

‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी सुरवातीलाच आपण बैठकीला उपस्‍थित राहणार नसल्‍याचे सांगितले होते. दरम्‍यान, गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’च्‍या नाराजीमुळे या दोन्‍ही पक्षांचे तीन आमदार बैठकीला उपस्‍थित राहणार की नाहीत, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

सत्ताधाऱ्यांना उघडे पाडणे हाच अजेंडा

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले की, येत्‍या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्‍नांवरून उघडे पाडणे हाच आमचा प्रमुख अजेंडा असेल. विजय सरदेसाई आणि वीरेश बोरकर यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. त्‍यावर आपल्‍याला काहीही बोलायचे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT