गोव्यातील भाजप सरकार विरोधकांना तोंड देण्यास घाबरत आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचा खून - दिगंबर कामत

गोव्यातील भाजप सरकार विरोधकांना तोंड देण्यास घाबरत असून, आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या सरकारने टाळले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील प्रत्येक घटनात्मक संस्था नष्ट (Constitutional entity destroyed) केल्यानंतर आता भाजप सरकारने (BJP government) विधानसभेत कामकाजात सहभागी होण्याचा आमदारांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला आहे. गोव्यातील भाजप सरकार विरोधकांना तोंड देण्यास घाबरत असून, आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या सरकारने टाळले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Opposition leader Digambar Kamat) यांनी केली.

आज विधानसभेच्या मागील सत्रात पुढे ढकललेले व आज क्रमांकीत झालेल्या तारांकीत प्रश्नांनाही सरकारने उत्तर दिले नाही यावरुन सरकारला काहितरी लपवायचे आहे हे स्पष्ट होते. भाजप सरकारने लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचा खून केला, असे त्यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोवा विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील कामकाजावर प्रतिक्रीया देताना त्यांनी सरकारला धारेवर धरले.

भाजपने आमची जीवनदायिनी आई म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला हे सत्य आता उघड झाले आहे. जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी आज विधानसभेत गोव्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यानी मंत्रीमंडळाची मंजुरी न घेताच कर्नाटक भाजप अध्यक्षांना पत्र लिहील्याचे मान्य केल्याने भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी गोव्याच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी नमूद केले.

गोवा सरकारने म्हादई जलतंटा लवादाचा आदेश अधिसुचीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली त्यावेळी गोव्याच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. मुख्यमंत्र्यानी आज सदर वकील बदलला असे विधानसभेत सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सरकारने सदर वकीलाने कोणाच्या सल्ल्यावरुन घेतली होती या विषयाची सर्व कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवावीत अशी मागणी मी केली आहे. सरकार या सत्रातच सदर कागदपत्रे देणार अशी आशा बाळगतो असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पावर चर्चा न करताच तो संमत करण्याचा विक्रम भाजप सरकार करणार असुन, इतिहासात त्यांची नोंद राहणार आहे. भाजप सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलले असुन, राज्याचे कर्ज आज २६ हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. राज्यात आर्थिक आणिबाणीची स्थिती असून, प्रत्येकाचे घरगुती बजेट आज कोलमडले आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. विधीमंडळ कामकाज मंत्री माविन गुदीन्हो यांनी कामकाज सल्लागार समितीने चर्चेविनाच अर्थसंकल्प मंजूर करण्यास मंजुरी दिली होती असे खोटे सांगुन विधानसभा सदस्यांचा अपमान केला आहे. मी त्यांचा निषेध करतो असे कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT