Water Sports In Colva Beach  Dainik Gomantak
गोवा

Beach Sports Tourism Hub: आता ऑस्ट्रेलिया, ब्राझीलला जायला नको, गोवाच बनणार 'बीच स्पोर्ट्स टुरिझम हब'! सरकारची नवी योजना

Goa Assembly Session: गोवा विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे पर्यटन क्षेत्र अधिक मजबूत आणि बहुआयामी करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे पर्यटन क्षेत्र अधिक मजबूत आणि बहुआयामी करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आमदार जीत आरोलकर यांनी पर्यटन विभाग आणि क्रीडा विभागाने एकत्रितपणे काम करुन गोव्याला ‘बीच स्पोर्ट्स टुरिझम हब’ (Beach Sports Tourism Hub) म्हणून विकसित करण्याचे सुचवले आहे. त्यांच्या मते, यामुळे गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा उपयोग करुन पर्यटन क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल आणि तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

गोव्याच्या तरुणांसाठी नवीन संधी

आरोलकर यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, गोवा हे सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे वरदान लाभलेले राज्य आहे. आता आपल्याला त्याचा उपयोग पर्यटन वाढीसोबतच स्थानिक तरुणांना नवीन कौशल्ये शिकवण्यासाठी करायला हवा. त्यांनी बीच व्हॉलीबॉल, सर्फिंग, बीच क्रिकेट आणि काईटबोर्डिंग यांसारख्या खेळांमध्ये गोव्यातील तरुणांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला. यामुळे, हे तरुण केवळ खेळाडू म्हणून नव्हेतर प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणूनही नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करु शकतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्दिष्ट

आरोलकर यांनी गोव्याला जागतिक स्तरावर नेण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले. त्यांनी ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि थायलंड यांसारख्या देशांचे उदाहरण दिले, जे त्यांच्या बीच स्पोर्ट्ससाठी जगभर प्रसिद्ध आहेत. याच देशांच्या धर्तीवर गोव्यालाही बीच स्पोर्ट्सचे जागतिक केंद्र बनवण्याची योजना आखली पाहिजे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बीच स्पोर्ट्स स्पर्धांचे आयोजन केल्यास जगभरातील पर्यटकांना गोवा आकर्षित करु शकेल आणि राज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मजबूत ‘ब्रँड’ म्हणून ओळख निर्माण होईल.

पायाभूत सुविधांचा विकास आणि समुद्रकिनाऱ्यांची निवड

दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरोलकर यांनी काही गोष्टी सुचवल्या. ते म्हणाले की, सरकारने यासाठी काही महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांची निवड करावी. यामध्ये मोरजी, हरमल, कळंगुट आणि कोलवा यांसारख्या लोकप्रिय किनाऱ्यांचा समावेश असावा. या किनाऱ्यांवर उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करता येईल. यात खेळाच्या मैदानांची उभारणी, प्रेक्षकांसाठी सोयी, आणि आवश्यक प्रशिक्षण सुविधांचा समावेश असेल.

आर्थिक आणि सामाजिक फायदे

दुसरीकडे, या योजनेचा थेट फायदा गोव्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे मोठ्या संख्येने येणारे दर्जेदार पर्यटक (quality tourists) केवळ पर्यटन हंगामातच नव्हे, तर वर्षभर गोव्यात येतील. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना सतत उत्पन्न मिळेल आणि राज्याचा पर्यटन हंगाम अधिक काळासाठी सुरु राहील. हा प्रस्ताव गोव्याच्या पर्यटन विकासाला एक नवी दिशा देणारा असून, तो राज्यातील तरुणांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी संधी ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT