Chief Minister Dr. Pramod Sawant, in Goa Assembly Session. Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: अटल सेतूवरील खड्ड्यांचा अभ्यास चेन्नई आयआयटी करणार

अटल सेतुवर खड्डे‌ का‌ पडतात (Goa Assembly Session)

अवित बगळेavit.bagle@esakal.com

पणजी: अटल सेतुवर (Atal Setu) वारोंवार खड्डे का पडतात, याचा अभ्यास आता चेन्नईच्या आयआयटीकडे (Chennai IIT) देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी आज विधानसभेत (Goa Assembly Session) दिली. झुआरी पुलाच्या (Zuari Bridge ) चौपदरी भाग 19 डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल असेही त्यांनी नमूद केले. विरोधी आमदारांनी संयुक्तपणे लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील महामार्ग (Goa State Highway) कामाचा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले अटल सेतूची पणजीत (Panajim) उतरणारी बाजू जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. महामार्ग कामांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते, त्याची सरकार करणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आदेश देणार आहेत. हे काम केंद्र सरकारचे असले तरी जनतेला त्या कामाचा फार त्रास होऊ नये याची दक्षता सरकार घेईल मात्र बगल मार्ग काढण्यासाठी आजूबाजूला तेवढी जागा उपलब्ध नसल्याने थोडी कळ सोसावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Opposition Leader Digambar Kamat) म्हणाले की, महामार्गांच्या कामावर कोणाचे नियंत्रण नाहीये, कोणत्याही रस्त्याचे काम करताना बगल मार्ग काढणे आवश्यक असते, सरकार वाहनधारकांकडून रस्ता कर घेते, त्यामुळे चांगले रस्ते देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी असल्याची कामत यांनी सरकारला जाणीव करून दिली. कुठ्ठाळी (Cortalim) येथे वाहतूक सुरू असताना रस्ते बांधणीची मोठी कामे केली जातात त्यामुळे उंचावरून काहीतरी कोसळून दुर्घटना घडू शकते. असेही विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले. याविषयी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे (Porvorim MLA Rohan Khaunte) यांनी देखील आपले मत मांडताना, नियोजनशून्य पद्धतीने रस्त्याची कामे चालू असल्याचे खवंटे म्हणाले.

गिरी (Girim) येथे पाणी साचून शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण होते. बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यामध्ये (Farm field) टाकल्याने शेती करताना समस्या निर्माण होत आहे, महामार्ग रुंदीकरणाचे काम होत असताना जलवाहिनी फुटणे, भूमिगत वीजवाहिन्या तुटणे अश्या गोष्टी घडत असतात त्याचा सरळ सरळ फटका जनतेला बसतो. कंत्राटदाराने कामे करताना याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि तशीच एखादी समस्या निर्माण झाली, तर त्यावर त्वरित दुरुस्ती करण्यासाठी यंत्रणाही तयार ठेवली पाहिजे. अटल सेतू आता उखडू लागलेला आहे, पाच वर्षांनी कंपनी आपले हात वर करेल, याला जबाबदार कोण याचे उत्तर सरकारने द्यावे. यावेळी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर (MLA Sudin Dhavalikar), साळगावचे आमदार जयेश साळगावकर (MLA Jayesh Salgaokar), नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो (MLA Luisin Fallero) यांनी चर्चेत भाग घेतला होता.

खांडेपार रस्ता वर्षभरात

खांडेपार येथील पुलाला (Khandepar Bridge) जोडणाऱ्या रस्त्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली. फोंड्याचे आमदार रवी नाईक (Ponda MLA Ravi Naik) यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, खांडेकर पुलाला जोडणारा रस्ता अर्धवट आहे. त्या परिसरात एक घर होते ते काढण्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे या कामात थोडा उशीर झाला आहे. आता घर मालक घर काढण्यास तयार झाले झाल्यानंतर घर हटवले गेले आहे. त्यामुळे आता काम करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निविदा काढणे वगैरे कामे केली जातील आणि वर्षभरात या रस्त्याचे काम सरकार पूर्ण करणार आहे. यामुळे खांडेपार येथून थेट फोंडा शहरात जाता येणार आहे. रवी नाईक म्हणाले, या प्रकल्पाचा खर्च 192 कोटी रुपयांनी का वाढला याचे उत्तर सरकारनेच द्यावे. हा काही फ्लायओव्हर नव्हे तर पुल आहे. त्याला जोडणारा रस्ता अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावरून खाली पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT