Goa Assembly Session | Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: पणजीतील सर्व सरकारी इमारतींवर बसवणार सोलर पॅनेल

वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

Akshay Nirmale, गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Assembly Session 2023: गोव्याची राजधानी पणजीतील सर्व सरकारी इमारतींवर सोलर पॅनेल बसवणार असल्याची माहिती, वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज, सोमवारी विधानसभा अधिवेशनात बोलताना दिली.

मंत्री ढवळीकर म्हणाले की, सर्व सरकारी इमारतींवर सोलर पॅनेल बसवून त्यातून सौरउर्जेद्वारे वीजनिर्मिती केली जाईल. १५० मेगावॉट वीज निर्मिती याद्वारे केली जाईल. या आर्थिक वर्षापासून या कामाला सुरवात केली जाणार आहे आणि मार्च २०२४ पर्यंत हे काम पुर्ण केले जाणार आहे.

काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, राजधानी पणजी शहराची ओळख ‘सोलर सिटी’ म्हणून करण्यासाठी येत्या 2 वर्षांत शासकीय व खासगी उपक्रमांतून शहरासाठी लागणारी 80 मेगा वॅट सौरऊर्जा निर्माण करण्यात येईल.

सरकारी इमारतींवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. ज्या व्यावसायिक आस्थापने, कॅसिनो इत्यादींसाठी छतावर सौरऊर्जा निर्मिती करणे शक्य नाही ते इतर कोणत्याही ठिकाणी सौरऊर्जा निर्मितीचा पर्याय निवडू शकतात आणि त्यातून निर्माण होणारी वीज ग्रीडमध्ये हस्तांतरित केली जाईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Live Updates: कोलव्यात क्लिनिकला आग

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

SCROLL FOR NEXT